पाणी टंचाई लक्षात घेऊन मुंबईत पुरवठ्याचे नव्याने नियाेजन करणार

28 Nov 2025 22:49:41
 
 

dd 
स्वत:च्या मालकीचे धरण आणि पुरेसे पाणी असूनही नवी मुंबईतील काही उपनगरांत वारंवार निर्माण हाेत असलेली पाणीटंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा शहराचे जलनियाेजन करण्याचा निर्णय घेतला आहे. काेपरखैरणे ते ऐराेलीसाठी पारसिक हिलपासून महापेपर्यंत पाच फूट व्यासाची नवी जलवाहिनी टाकली जाणार आहे.माेरबे धरणाचे पाणी सध्या बेलापूर येथील पारसिक डाेंगरावरील जलकुंभात साठवून पुढे ते बेलापूरपासून ऐराेली- दिघापर्यंतच्या वेगवेगळ्या उपनगरांना वितरित केले जाते.
 
या वितरण व्यवस्थेत काही त्रुटी निर्माण झाल्यास काेपरखैरणेपासून दिघ्यापर्यंत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा हाेत नाही, असा निष्कर्ष पाणीपुरवठा विभागाने काढला आहे.यावर उपाय म्हणून पारसिक हिलपासून महापेपर्यंत पाच फूट व्यासाची नवी जलवाहिनी टाकली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठाविभागाचे प्रमुख अरविंद शिंदे यांनी दिली.हे काम पूर्ण हाेताच बेलापूरपासून वाशी आणि बेलापूर ते महापे अशा दाेन स्वतंत्र जलवाहिन्या कार्यान्वित हाेतील. यामुळे संपूर्ण शहरात जलवितरण व्यवस्थेचा समताेल राहील आणि सर्वच उपनगरांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पाेहाेचवता येईल. या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0