कुंभमेळ्यात भाविकांना दर्जेदार बँकिंग सेवा द्यावी

28 Nov 2025 22:55:40
 
 

kumbh 
 
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये हाेणाऱ्या कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिक, त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात देश- विदेशातून माेठ्या संख्येने भाविक येतील.या भाविकांना त्या कालावधीत व्यवहार करताना काेठेही अडचण येऊ नये.त्यासाठी सर्व बँकांनी दर्जेदार बँकिंग सेवा पुरवावी, अशी सूचना नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंह यांनी केली.प्राधिकरणाने राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली.बँक ऑफ महाराष्ट्राचे राजेश देशमुख, प्रतीक पाटील, बँक ऑफ बडाेदाचे मयंककुमार, राजेंद्र राऊत, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रभातकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रितेश निकम, येस बँकेचे प्रसाद राॅय यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित हाेतसध्या सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डिजिटल कुंभाला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
 
कुंभमेळ्यासाठी येणारे साधू-महंत, भाविकांना दर्जे दार आर्थिक सेवा पुरवाव्यात. त्यासाठीबँकिंग सुविधांचे बळकटीकरण करावे.
ठिकठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित करतानाच त्यांच्यात राेकड राहील याची दक्षता घ्यावी. साधूग्राम, गाेदावरी घाट, त्र्यंबकेश्वर, रेल्वे व बस स्थानक, पार्किंगच्या ठिकाणी प्राधान्याने बँकिंग सुविधा उपलब्ध हाेईल, याची दक्षतायावी, अशा सूचना शेखर सिंह यांनी केल्या.बँकिंग सेवा सलग सुरू राहील याची दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत. विक्रेते, स्वयंसेवी संस्था, वाहतूक, पार्किंगसाठी क्यूआर-आधारित यूपीआय टर्मिनल कार्यान्वित करावे. कमी नेटवर्क असलेल्या पाॅकेट्ससाठी यूपीआय लाइट आणि फीचर-फाेन पेमेंटचा वापर करण्यात यावा. आर्थिक साक्षरता, डिजिटल याविषयी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही याचीही दक्षता घ्यावी. भाविकांना मराठीसह हिंदी, इंग्रजीत बँकिंग सुविधांची माहिती देण्यात यावी. अमृत स्नान, पर्वणी कालावधीत दैनंदिन राेख रकमेचा अंदाज घेऊन नियाेजन करावे, काेषागार, पाेलीस आणि बँकांनी समन्वयासाठी कक्ष कार्यान्वित करावा, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
Powered By Sangraha 9.0