संविधान अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

28 Nov 2025 22:50:57
 
 
COI
 
संविधान सभेने 26 नाेव्हेंबर 1949 राेजी राज्यघटना स्वीकृत केली. त्यानंतर ती 26 जानेवारी 1950 राेजी अमलात आली आणि देशाच्या इतिहासात नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा आहे. संविधानाच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील 36 जिल्ह्यांत चित्ररथ प्रदर्शन आयाेजित करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली.या चित्ररथाची संकल्पना अ‍ॅड. शेलार यांची आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन 36 जिल्ह्यांत करण्यात येणार आहे. संविधानावर आधारित चित्ररथ सादरीकरणामुळे संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये लाेकांपर्यंत पाेहाेचवण्यास मदत हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0