केंद्रीय जलश्नती मंत्रालयामार्फत जल व्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांत (2024) महाराष्ट्राला सर्वाेत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला; तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.येथील विज्ञान भवनात झालेल्या साेहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलश्नती मंत्री सी. आर. पाटील, राज्यमंत्री राजभूषण चाैधरी, राज्यमंत्री व्ही. साेमण्णा, विभागीय सचिव व्ही.एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशाेक, के. के. मीना यावेळी उपस्थित हाेते.
विखे पाटील यांच्यासाेबत राज्याच्याजलसंपदा विभागाचे अतिर्नित मुख्य सचिव दीपक कपूरही उपस्थित हाेते. जल संसाधनाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचे राष्ट्रपतींनी काैतुक केले.राज्य शासनाने राबवलेल्या अभिनव जल व्यवस्थापन धाेरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसेच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे, असे विखे पाटील यांनी महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.सर्वाेत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात नवी मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार आयु्नत डाॅ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला.सर्वाेत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था या गटात नाशिक जिल्ह्यातील कनिफनाथ पाणी वापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला.