कन्या

23 Nov 2025 12:32:28
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रमाेशन मिळू शकते वा पगारवाढ हाेऊ शकते. कार्यक्षेत्रात तुमची हुशारी व मेहनत अनेक समस्या साेडवील. वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश हाेतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नव्या व्यवहारांमधून फायदा मिळवून देणारा असेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या मेहनतीच्या बळावर तुम्हाला आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. तुमचे वक्तशीर प्रयत्न व शिस्त यामुळे तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यापाऱ्यांना या आठवड्यात नवे ग्राहक मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधांमध्ये गाेडवा येईल.अविवाहित मंडळींसाठी लग्नासाठी स्थळे चालून येतील. त्यातून तुमच्या मनपसंत स्थळासाेबत तुमचा विवाहही हाेऊ शकताे. मित्रांसाेबतचे जुने तंटे मिटतील आणि त्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याची स्थिती उत्तम असेल. जुनाट राेगांपासून तुमची सुटका हाेईल. तसेच जर तुम्ही तुमची दिनचर्या व्यवस्थित राखाल तर त्याचा तुम्हाला फायदा हाेईल. जर तुम्हाला एखादे अनिष्ट व्यसन असेल तर ते तुम्ही साेडणे तुमच्यासाठी हितकर ठरेल.
 
 शुभदिनांक : 24, 25, 29
 
 शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : आर्थिक देवघेवीत घाई करू नये व वादात संयम राखावा.
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेला कमळ व शुभ्र मिठाई अर्पण करावी. ॐ महालक्ष्म्यै नम: मंत्राचा जप 108 वेळा करावा.
Powered By Sangraha 9.0