शिवपुत्र कार्तिकेय अविवाहित आहेत असे आपण मानताे. कार्तिकेयाचे ज्येष्ठ बंधू गणेशाला दाेन पत्नी रिद्धी आणि सिद्धी असल्याचे मानताे. पण दक्षिण भारतात कार्तिकेयाला दाेन पत्नी असल्याचे मानतात. तिरुनेल्लुर या छाेट्याशा गावात मध्यभागी हे कार्तिकेय मंदिर आहे. या मंदिर परिसरात स्वर्ण विनायक, लक्ष्मी आणि पत्नीसह कार्तिकेय मूर्ती आहेत. दक्षिण भारतात कार्तिकेयाच्या दाेन पत्नींची नावे वल्ली आणि देवसेना अशी आहेत.येथे स्त्रियांना कार्तिकेयाचे दर्शन घेता येते; पण देशातील काेणत्याही कार्तिकेय मंदिरात दर्शनासाठी स्त्रियांनरस्वती तीर्थम्, अगस्त्य तीर्थम्, हंस तीर्थम् आणि नल तीर्थम् अशी या पाच तलावांची नावे आहेत. ब्रह्मतीर्थ तलावात स्नान केल्यास माेक्ष मिळताे, अशी श्रद्धा आहे. नलतीर्थामध्ये स्नान करून नवी वस्त्रे धारण करावीत व तुम्ही परिधान केलेली जुनी वस्त्रे तेथेच फेकून द्यावीत, अशी परंपरा आहे. येथे नलतीर्थावर जुने कपडे टाकून दिले, तर आपले दुर्भाग्य, निराशा, संकटे, अडचणी दूर हाेतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या तलावात स्नान करण्यासाठी अंगाला तिळाचे तेल लावणे आवश्यक असते. कारण शनीला तीळ आवडतात.