वृश्चिक

23 Nov 2025 12:28:07
 

Horoscope 
 
वृश्चिकया आठवड्यात तुमच्यासाठी मनाेबल व व्यावहारिक दृष्टिकाेन महत्त्वाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या हुशारी व मेहनतीने अनेक समस्या सुटतील.तसेच तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जातील. व्यापाऱ्यांसाठी नवे व्यवहार आणि अधिक लाभदायक संपर्क प्राप्त हाेतील.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा नाेकरदार जातकांसाठी कामाच्या व्यापाचा व आव्हानात्मक राहणार आहे. एखाद्या प्राेजे्नटमध्ये तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या प्रयत्न व नेतृत्वक्षमतेचे वरिष्ठ व सहकारी प्रशंसा करतील. व्यापाऱ्यांसाठी याेजनापूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये भक्कमपणा येईल.जाेडीदाराचे समर्थन मिळाल्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास व मानस्नि स्थैर्य वाढेल. विवाहेच्छुक मंडळींसाठी नवी स्थळे चालून येतील. वाद वा मतभेदाच्या प्रसंगी तुम्ही धैर्य राखून समजुतदारपणे वागणे गरजेचे आहे.
 
 आराेग्य : या आठवड्याच्या तुम्ही तुमच्या तब्बेतीबाबत सावध राहायला हवे. विशेषत: माेसमी आजारांपासून जपण्यासाठी विशेष सावधगिरी बाळगावी.मानसिक शांती मिळवण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा आणि याेगासनांचा आधार घेऊ शकता. त्याप्रमाणेच बाहेरचे खाणे टाळावे.
 
 शुभदिनांक : 23, 26, 28
 
 शुभरंग : लाल, साेनेरी, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात भावनेच्या भरात काेणताही माेठा निर्णय घेऊ नये.आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी.
 
 उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमानाला लाल फूल व शेंदूर अर्पण करावा व ॐ हनुमते नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.
Powered By Sangraha 9.0