लाडकी बहीण याेजनेतील बाेगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे. या ई केवायसीची मुदत 18 नाेव्हेंबरला संपणार हाेती.अद्यापही 2 काेटी 54 लाख महिलांपैकी केवळ दीड काेटी महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. एक काेटींवर महिलांचे ई-केवायसी झाले नसल्याने ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.राज्यात अडीच काेटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण याेजनेच्या माध्यमातून दर महिना 1500 रुपये जमा केले जातात. अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असताना या याेजनेचा लाभ सरकारी कर्मचारी तसेच अडीच लाखांपेक्षा अधिक काैटुंबिक उत्पन्न असलेल्या महिला घेत असल्याची बाब समाेर आली. त्यामुळे अशा बाेगस लाभार्थ्याना या याेजनेतून वगळण्यासाठी ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. त्यासाठी 18 नाेव्हेंबरपर्यंत असलेली मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.ई-केवायसीत येणाऱ्या अडचणी, संगणकीय सर्व्हरमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.