कन्या

23 Nov 2025 12:36:21

Horoscope
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वासं आणि नेतृत्वक्षमता प्रमुख भूमिका बजावेल.कार्यक्षेत्रात तुमच्या सक्रियतेमुळे व निर्णय घेण्याच्या क्षमतेने अनेक समस्या सुटतील. जुनी अर्धवट राहिलेली कामे व नव्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. गुंतवणूक करताना विवेकबुद्धीचा वापर करा.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात नाेकरदारांसाठी कार्यक्षेत्रात नव्या संधी चालून येतील. ते त्यांच्या कार्यकुशलतेच्या व शिस्तबद्ध प्रयत्नांच्या बळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास मिळवतील. व्यापारी वर्गाला त्यांच्या जुन्या व्यवहारांमधून फायदा हाेईल व आर्थिक प्राप्ती वाढेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक वातावरण सुखद राहील. जीवनसाथीची मदत तुमचे मनाेबल वाढवील. प्रेमसंबंधात सकारात्मकता वाढेल. काैटुंबिक वातावरण वा तुमचे प्रेम यामधील आनंद व सुख वाढवण्यासाठी तुम्ही संवाद साधण्यावर जास्त भर द्यायला हवे. मुलांकडून आनंदाची बातमी कळू शकते.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. पण उत्तरार्धात निद्रानाश आणि मानसिक द्विधावस्थेमुळे शारीरिक आळस आणि तणाव वाढू शकताे. मानसिक शांती राखण्यासाठी मेडिटेशन व याेगासने करावीत. माेसमी आजारांपासून जपावे. .
 
 शुभदिनांक : 23, 26, 28
 
 शुभरंग : लाल, साेनेरी, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात गर्विष्ठपणा व अतिआत्मविश्वासापासून दूर राहा.आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक पावले उचला.
 
 उपाय : रविवारी सूर्याला अर्घ्य देऊन लाल फूल वाहा ॐ घृणि सूर्याय नम: मंत्राचा जप 108 वेळा करावा.
Powered By Sangraha 9.0