चांगल्या आराेग्यासाठी डेझर्टला नाही म्हणायला शिका

23 Nov 2025 15:33:03
 

Health 
 
 
जेव्हा तुम्ही गाेड पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते कारण ग्लुकाेज रक्तप्रवाहात जाते, ज्यामुळे ही वाढ नियंत्रित करण्यासाठी इन्शुलिनचा स्राव हाेण्यास सुरुवात हाेते.रात्रीच्या वेळी चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे शरीराची साखरेची पातळी हाताळण्याची क्षमता माेठ्या प्रमाणात कमी हाेते.रक्तात साखरेची पातळी वाढताच शरीराच्या हायपाेग्लायसेमियात घट हाेते. त्यामुळे झाेपेचा त्रास हाेऊ शकताे आणि सकाळी थकवा जाणवू शकताे.रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे किंवा गाेड पदार्थांचे सेवन केल्याने शरीराच्या सेल्युलर आणि हार्माे नल पातळीवर परिणाम हाेताे. त्यामुळे शरीराला इतर गाेष्टी साेडून ग्लुकाेज चयापचयावर लक्ष केंद्रित करावे लागते. एका अभ्यासातून असे दिसून आले की, रात्री उशिरा गाेड पदार्थांचे सेवन केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी हाेते. त्यामुळे चयापचय विकारांचा धाेका वाढताे.
 
रात्री उशिरा जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्याचे चरबीत रूपांतर हाेते, ज्यामुळे वजन वाढते.रात्री उशिरा गाेड पदार्थ खाल्ल्याने झाेपेची गुणवत्ता आणि एकूणच विश्रांती यांवर दुष्परिणाम हाेतात.रात्रीच्या वेळी गाेड पदार्थ खाल्ल्याने झाेपेच्या गुणवत्तेवर परिणाम हाेताे. त्यामुळे शरीरास पुरेशी विश्रांती मिळत नाही. कारण- त्यामुळे हार्माेनल आणि चयापचय क्रिया बाधित हाेते. साखरेच्या सेवनाने झाेपेचे नियमन करणारे हार्माेन मेलाटाेनिनवर दबाव निर्माण हाेताे. त्याच वेळी काॅर्टिसाेल हार्माेनमध्ये वाढ हाेते. हा हार्माेन तणावास कारणीभूत ठरताेत्याचा तुमच्या झाेप, विश्रांतीवर वाईट परिणाम हाेताे.रक्तातील साखरेची पातळीत अचानक झालेली वाढ आणि घट यांमळे तुमच्या झाेपेवर दुष्परिणाम हाेताे.अचानकपणे साखरेच्या पातळीत वाढ झाल्याने शरीरास ऊर्जा मिळते; पण यामुळे अस्वस्थताही जाणवू शकते.
 
अशा वेळी साखरेची पातळी कमी करणे कठीण हाेते.कालांतराने रात्रीच्या वेळी नियमित साखरेचे सेवन केल्याने निद्रानाश आणि स्लीप अ‍ॅप्नियासह विशेषतः वजन वाढणे आणि चयापचय क्रिया विस्कळित झाल्याने झाेपेसंबंधित आजारांचा धाेका वाढू शकताे.
रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गाेड पदार्थ खाल्ल्याने हाेणारे आजाररात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गाेड पदार्थ खाल्ल्याने गंभीर आजारांचा धाेका वाढू शकताे. विशेषत: ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी असे करणे अधिक धाेकादायक ठरू शकते. मधुमेहाचे रुग्ण जर रात्रीच्या वेळी काही गाेड पदार्थ खात असतील, तर त्यांच्या शरीरातील इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी हार्माेनमध्ये वाढ हाेते.त्यामुळे दीर्घकाळपर्यंत रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत न्यूराेपॅथी, रेटिनाे पॅथी आणि किडनीसंबंधित आजारांचा धाेका वाढताे.
Powered By Sangraha 9.0