महा-देवा फुटबाॅल उपक्रमासाठी अभिनेता टायगर श्राॅफ ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

23 Nov 2025 15:19:02
 

football 
 
 
राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन महा-देवा फुटबाॅल उपक्रम राबवत आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध हाेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.अभिनेता टायगर श्राॅफ यांनी या प्रकल्पासाठी पाच वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फाॅर ट्रान्स्फाॅर्मेशन (मित्रा) आणि अभिनेता टायगर श्राॅफ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी सुखराज नाहर यांनी व्हिलेज साेशल ट्रान्स्फाॅर्मेशन फाउंडेशनला (व्हीएसटीएफ) एक काेटींचे अनुदान दिले. यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, संयु्नत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, अभिनेता टायगर श्राॅफ, नाहर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सुखराज नाहर आदी उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0