या आठवड्यात तुमच्यासाठी मेहनत, शिस्त व धैर्य प्रमुख भूमिका बजावतील.कार्यक्षेत्रात तुमची कटिबद्धता व मेहनत याद्वारे अनेक समस्या सुटतील. जुनी अर्धवट कामे पूर्ण हाेतील. नया जबाबदाऱ्या अंगावर येतील. गुंतवणूक करताना पूर्ण माहिती मिळवून विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. एखाद्या प्राेजे्नट वा जबाबदारीत यश मिळण्याची श्नयता आहे. तुमची मेहनत व कार्यकुशलता तुमच्या वरिष्ठांकडून वाखाणली जाईल.
नातीगाेती : या आठवड्यात वादाचे काही प्रसंग उद्भवण्याची श्नयता आहे. अशावेळी धैर्याने व समजुतदारपणे वागणे याेग्य ठरेल. जाेडीदाराच्या समर्थनामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. एकंदरीतच तुमच्या कुटुंबात व प्रेमसंबंधात साैख्य, समाधान आणि समजुतदारपणा राहील..
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. काहींना पाठ, खांदे वा मानदुखीचा त्रास संभवताे. त्यामुळे वाहन चालवताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच स्क्रीनटाइम कमी करावा. संतुलित आहार, पुरेशी झाेप व नियमित व्यायामाने तुम्ही तुमचे त्रास दूर करू शकाल.
शुभदिनांक : 24, 25, 29
शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : कामे घाईगडबडीत उरकू नयेत. अर्धवट कामात बेपर्वा राहू नये.
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाला काळे कपडे व काळे तीळ अर्पण करावेत. ॐ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 जप करावा. गरजूंना अन्न व वस्त्र दान करावे.