देशाचे लष्करी नेतृत्व टेकफेस्टमध्ये एकत्र येणार

23 Nov 2025 15:07:17

army
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा डिफेन्स सिम्पाेझियम 2.0 चे आयाेजन करण्यात आले आहे. त्यात देशातील आजी माजी लष्कर प्रमुख एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, संशाेधकांना आणि संरक्षण क्षेत्रातील जिज्ञासूंना ऐतिहासिक अनुभव मिळणार आहे.आशियातील सर्वात माेठा विज्ञान व तंत्रज्ञान महाेत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाेत्सवात डिफेन्ससिम्पाेझियम 2.0 हा कार्यक्रम 22 ते 24 डिसेंबरदरम्यान आयआयटी मुंबईच्या आवारात हाेणार आहे.नाेंदणीसाठी  techfest.org या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, प्रवेश माेफत आहे.देशातील सर्वांत वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि इंटिग्रेटेड थिएटर कमांड्सचे शिल्पकार म्हणून ओळखलेले जाणारे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चाैहान टेकफेस्टमध्ये उपस्थित राहणार आहेत.
 
संरक्षण क्षेत्रातील त्यांची धाेरणात्मक दृष्टी, कार्यक्षम नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेतील परिवर्तन याबाबत ते विचार मांडणार आहेत.त्यांच्यासह लष्कर, नाैदल आणि हवाई दलाचे माजी प्रमुखही सहभागी हाेणार आहेत. माजी लष्कर प्रमुख जनरल मनाेज पांडे, निवृत्त नाैदल प्रमुख डमिरल आर. हरी कुमार आणि निवृत्त हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चाैधरी यांचा यात समावेश आहे.या चारही नेत्यांनी आपल्या दशकभराच्या अनुभवातून आणि धाेरणात्मक दृष्टिकाेनातून देशाची संरक्षण व्यवस्था घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सत्रांमध्ये देशाच्या बदलत्या लष्करी प्राधान्यक्रमांचा आढावा, संयु्नत दलांची समन्वयाची भूमिका, आधुनिक युद्धशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0