या आठवड्यात तुमच्यासाठी नव्या जबाबदाऱ्या व आव्हाने समाेर येतील.कार्यक्षेत्रात तुमची निर्णयक्षमता व वेगाने विचार करण्याची क्षमता तुमचे यश सुनिश्चित करील. काही जुनी अर्धवट कामे व लांबलेली कामे पुन्हा चर्चेत येतील. अशा कामांत तुम्ही धैर्य व विवेकाने काम करायला हवे.
नाेकरी-व्यवसाय : व्यावसायिक आघाडीवर हा आठवडा सक्रिय व फलदायी राहील. नाेकरदारांवर नव्याा प्राेजे्नट्सची जबाबदारी टाकली जाऊ शकते. तुमचे परिश्रम व धाेरणी विचार माेठा मानसन्मान देऊ शकताे.व्यापाऱ्यांना अनेक फायदेशीर व्यवहार मिळण्याची श्नयता आहे.
नातीगाेती : या आठवड्यात नात्यांमध्ये सामंजस्य व संयम महत्त्वाचा राहील. जीवनसाथीसाेबतच्य परस्पर सहयाेगाने वातावरण सुखद असेल.अविवाहित जातकांसाठी या आठवड्यात एखादा विवाहाचा प्रस्ताव मिळू शकताे, परंतु घाई करू नये. एखादा जुना मित्र भेटू शकताे जाे तुमच्या भावना समजून घेईल.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्हाला थाेडासा थकवा व मानसिक दबाव सतावू शकताे. वाहन चालवताना सावध राहावे. मान, पाठ, खांदे दुखण्याचीही श्नयता आहे..त्याप्रमाणेच नियमित व्यायाम व समताेल आहार घ्यावा. ध्यानधारणा करावी
शुभदिनांक : 23, 26, 28
शुभरंग : लाल, साेनेरी, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
दक्षता : या आठवड्यात आर्थिक देवघेवीत घाई करू नये. .
उपाय : मंगळवारी हनुमानाला लाल फूल व शेंदूर अर्पण करावा व ॐ हनुमते नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा. गरजूंना मदत करावी.