स्वयंपाक करणे म्हणजे फक्त भूक भागवणे नाही, तर एक अनुभव आहे, जाे विविध संस्कृती आणि परंपरांशी जाेडलेला असताे.विविध पाककृती वाचणे आणि शिकणे, अनुभवी लाेकांकडून शिकणे, नवनवीन प्रयाेग करणे, प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणे. स्वयंपाकाच्या कलेत नैपुण्य मिळवण्यासाठी, तुम्हाला सतत शिकत राहण्याची आणि वेगवेगळ्या गाेष्टींचा प्रयाेग करण्याची तयारी ठेवावी लागेल.केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती राेज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावताेच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असताे. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टरहा अग्रस्थानी असताे. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्या पाण्याचा चैतन्याचा झरा.
छाेटे माेठे सगळेच ज्याची उघडझाप करतात अशी एक दार असलेली थंडगार तिजाेरी म्हणजे फ्रीज सगळ्यांचाच लाडका असताे. पदार्थाला एकसंध धरून ठेवणारे वाटण म्हणा की एखादी चटपटीत चटणी करण्यासाठी लागणारा म्निसर दिवसातून एकदा तरी भिरभिरताेच. काही किचन मध्ये ओव्हन नावाची छाेटीशी गुहा असते ती घंटाे का काम मिनटाे मे करायला बरेचदा गृहिणीला फायदेशीर ठरते.स्वयंपाक करताना संयम आणि शिस्त अतिशय महत्त्वाची असते. पटकन व्हावा म्हणून सगळे पटापट शिजवले जाते किंवा भाजले जाते, तळले जाते. त्यामुळे पदार्थवरून भाजल्यासारखा वाटताे पण अनेकदा आतून कच्चाच राहताे. त्यामुळेच स्वयंपाक करताना काही नियम पाळणे आवश्यक ठरते. ज्याप्रमाणे कुठलाही कलाकार किंवा खेळाडू त्याच्या आयुधांची चांगली निगा राखताे त्याप्रमाणेच स्वयंपाक शिजवण्यासाठी लागणाऱ्या साधनांची देखील देखभाल आवश्यक असते.
म्हणजेच सचिनचे उदाहरण घ्यायचे झाले तर ताे त्याच्या बॅटची तसेच किट मधील अन्य गाेष्टींची अतिशय काळजी घ्यायचा त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाक घरातील सर्व साहित्याची आपण काळजी घेतली तर स्वयंपाक चांगला हाेताे.म्हणजेच सुऱ्यांना धार हवी, कढया, पातेली यांची जाडी मापात हवी. खूप पातळ नकाे किंवा जाडही नकाे. पदार्थ शिजवण्यासाठी चुकीचे भांडे वापरले गेले तरी ताे बिघडू शकताे. एक वेळ भाजीत तेल जास्त झाले तरी चालते पण पाणी प्रमाणात घालायला हवे.भात कुकरमध्ये पटकन हाेताे, पण पातेल्यात शिजवलेल्या भाताची चव वेगळीच लागते. भातात एकदाच पुरेसे पाणी टाकायचे.सतत टाकत राहिले की चव बिघडते आणि भात पांचट हाेताे. एक दाेनदा भात शिजवला की या तांदळाला शिजायला किती पाणी लागेल याचा अंदाज यायलाच हवा. नवा तांदूळ, जुना तांदूळ ओळखता यायला हवा. इंद्रायणी तांदळाला कमी पाणी लागते, बासमती किंवा काेलामला शिजायला जास्त पाणी लागते.