त्रासाला सामाेरे जाताना पूर्वीच्या अनुभवांतून धडा घ्या

20 Nov 2025 17:08:29
 
 

Health 
दु:खी हाेणे वा उदास हाेणे वाईट गाेष्ट नाही. त्यामुळे आपण जबरदस्तीच्या हसण्यामागे आपले दु:ख, तणाव आणि अश्रू दडवू लागताे. मुलांची स्मरणशक्ती तितकीशी प्नकी नसते.त्यामुळे ती लवकरच नाराजीचे कारण विसरून पुन्हा खूश हाेतात. माेठ्यांचे असे हाे नसते. त्यांना स्वत:चा तणाव विसरून जाणे कठिण जाते.मला आजपर्यंत हे कळले नाही की, जर आपल्या नकारात्मक भावना काेणाचे नुकसान करीत नसेल तर त्या जाणवायला काय हरकत आह. नेहमी आपल्या नकारात्मक भावना समजून न घेता, न अनुभवता साेडण्यास सांगितले जाते. याउलट मला वाटते की, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम त्या जाणवायला हव्यात.
 
काेणतीही भावना वा संवेदना मनात दाबून ठेवणे घातक असते. कधी ना कधी त्या भावना बाहेर येतातच. त्यावेळी त्यांनी एवढे विक्राळ रूप घेतलेले असते की, आपल्याला व आपल्या माणसांना दु:ख हाेऊ लागते.त्यामुळे सर्व जाणीवा जाणवणे चांगले.जाणवा आपला तणाव, आपले दु:ख, राग आणि नंतर जाेरात किंचाळा, रडा आणि आपला राग बाहेर काढा. काहीही करा पण आपल्यातील विष बाहेर काढा.आपले शरीर दमवा, जिममध्ये व्यायाम करा, एकटे काही वेळ घालवा. ज्याच्या खांद्यावर डाेके ठेवून आपण रडू शकताे आपले मनहलके करू शकताे, असा मित्र शाेधा.अर्थात असे काहीही करा की, ज्यामुळे आतील सारा राग बाहेर पडून वाहून जाईल.यानंतरच आपण खरी शांती व समाधान अनुभवू शकाल.
 
पण जसा प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उजेड येताे तसेच प्रतयेक दु:ख व तणावानंतर चांगले क्षणही येणे स्वाभाविक असते. एकदा विषाद जाणून घेण्याचा अर्थ अजिबात असा नाही की, पुन्हा सुख व उल्हास जाणवणारच नाही.पुन्हा परतेल हास्य जरी आता काही ठीक नसले तरी हास्य अवश्य पुन्हा परतेल. थकून धीर साेडण्यापूर्वीहे जाणवून घ्या की, वेदना क्षणभंगूर असते व ती दूर हाेणारच असते. स्वत:ला विश्वास देऊन पहा की, आजपासून एक वर्षानंतर आपण एकदम नवा माणूस झाला असाल.जाणारा काळ आपल्याला नेहमी मजबूत व उत्तम माणूस बनवताे. एक वर्षानंतर आपल्या या दु:ख व तणावाच्या खाेळीतून एक मजबूत माणूस बाहेर आलेला असेल.
 
सारे मित्र आयुष्यभर नसतात आपल्या कठिण काळात आपल्या बरेच मित्र आपल्या बाजूने उभे न राहिलेले आपण पाहाल. वास्तविक आपल्या चांगल्या काळात ते त्यांच्या स्वार्थामुळे आपल्या साेबत हाेते आणि आज आपल्याला गरज असताना पाठ फिरवून उभे आहेत. खरा मित्र ताेच असताे जाे आपले दु:ख समजून घेत आपल्या पाठीशी उभा राहताे.आपल्या वेदनेला आपली श्नती बनवा आपल्या वेदना व त्रास आपली कमजाेरी नव्हे तर शक्ती बनून समाेर यायला हवी. वेदनेने हिंमत हरण्याऐवजी तिला हे दाखवा की आपल्याला काेणी राेखू शकत नाही. आपली हिंमत नेहमी बुलंद ठेवा.जेव्हा पुन्हा कधी त्रासाला सामाेरे जाल तेव्हा पूर्वीच्या अनुभवांतून धडा घेऊन संकटाशी लढण्यास तयार व्हा. यावेळी नक्की यश मिळेल कारण आपण जास्त मजबूत झालेले असता.
Powered By Sangraha 9.0