राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वनजमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन भ्नकमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गाैरव वर्षातर्गत येथीलमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महाेत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस बाेलत हाेते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डाॅ.अशाेक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यावेळी उपस्थित हाेते.
देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे माेठे याेगदान आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करत असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्पकरण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.राणी दुर्गावती याेजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी हाेत असल्याचे डाॅ. उईके यांनी सांगितले.सुराबर्डी, नागपूर येथील गाेंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशाेधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा (घानवळ), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (जव्हार) येथील इमारतीचे लाेकार्पण, शासकीय आश्रमशाळापळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प-जव्हार येथील प्रयाेगशाळेचे लाेकार्पण, शासकीय आश्रमशाळादेवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (नाशिक) येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लाेकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.