नागरिकांच्या सुविधांना अधिकाधिक प्राधान्य देऊन शासकीय सेवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन प्रयत्न करत आहाेत.सचिव पातळीवर वेळाेवेळी याबाबत आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा ही भूमिका आहे. याला छेद देत काही कार्यालयांबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन खामला येथील सहदुय्यम उपनिबंधक वर्ग-2 कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी करावी लागली, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.खामला भागातील सहदुय्यम उपनिबंधक कार्यालयाबाबत आलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन बावनकुळे यांनी थेट या कार्यालयात अनपेक्षित भेट देऊन पाहणी केली.
या पाहणीत एका अधिकाऱ्याच्या टेबलमधील ड्राॅवरमध्ये राेख र्नकम आढळली. याबाबत त्यांनी पाेलिसांना याेग्य ताे तपास करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना काेणत्याही शासकीय कामासाठी काेणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारची शून्य- सहिष्णुतेची भूमिका आहे. कुणीही नागरिकांकडून लाच मागितल्यास न घाबरता तक्रार करा. पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. राज्यात महसूल विभाग अधिक जबाबदार आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत विशेष तपास माेहिमा राबवण्याचे संकेत दिले.