एरवी आपण या कणांपर्यंत पाेहाेचू शकत नाही. मात्र फ्लाॅस म्हणजेच अगदी बारीक दाेरा वापरून जातात अडकलेले अन्नाचे कण काढता येतात. फ्लाॅस केल्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या जास्तीत जास्त निराेगी ठेवण्यास मदत हाेते. फ्लाॅसिंग मुळे तुम्हाला श्वासाची दुर्गंधी टाळता येते. फ्लाॅसिंग सुरुवातीला अवघड वाटले तरी सरावाने ते साेपे हाेते. फ्लाॅस कसा धरायचा इथून तुम्ही शिकण्यास सुरू करू शकता.त्यानंतर दात कसे स्वच्छ करायचे ते शिकून घ्या. दात हेल्दी ठेवण्यासाठी फ्लाॅसिंग सवयीचा अवलंब करा.इतरांच्या बाेलण्यात व्यत्यय आणणे काही लाेकांना दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सवय नसते किंवा त्यांच्याकडे शवण करण्याची क्षमता नसते. अर्थातच ही सवय चांगली नाही. तुम्हाला जर का शांत बसता येत नसेल आणि दुसरी व्यक्ती बाेलताना तिच्या बाेलण्यात सतत व्यत्यय आणण्याची सवय असेल तर अर्थातच ही गाेष्ट चांगली नाही. तुमच्याकडून वारंवार असे घडले तर तुमची प्रतिमा उद्धट आणि आगाऊ अशी हाेते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल किंवा तुमची पाळी येईल तेव्हाच बाेलणे याेग्य ठरते.
न्याहारी न करणे अनेकांना ऑफिसला किंवा कामावर जाण्यासाठी घाई झाल्यामुळे नाष्टा न करता जाणे साेयीचे वाटते. अर्थात एकूण आराेग्यासाठी आणि दिवसभर तुमच्याकडून अधिक उत्पादक काम हाेण्याच्या दृष्टीने नाष्टा न करणे याेग्य ठरत नाही. तुमच्या शरीराला आणि मेंदूला सकाळी ऊर्जेची गरज असते.त्यामुळे तुम्ही जर ब्रेकफास्ट टाळला तर त्याचा परिणाम तुमच्या दिवसभरच्या कार्यक्षमतेवर हाेताे.मनात आले की खरेदी मनात आले की खरेदी करणे ही अतिशय चुकीची सवय आहे. आपल्याला बसल्या जागी अमुक एक गाेष्ट गरजेची आहे असे वाटले आणि लगेच ती खरेदी करण्यासाठी निघणे किंवा ऑनलाईन मागवणे याेग्य नाही. मनात आले म्हणून खरेदी करण्यामुळे अनिर्बंधपणे खर्च वाढत राहताे आणि अल्पकाळात ती समस्या हाेते. त्यामुळे मनात आले की खरेदी करण्याऐवजी गाेष्ट गरजेची असली तरी सुद्धा किमान त्यावर चार-पाच दिवस विचार करून मगच खरेदी करायची किंवा नाही याचा निर्णय घ्यावा.