मानव सेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 काेटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. सुवर्णयुग सहकारी बँकेकडून 25 लाखांचा धनादेश देण्यात आला. मुंबईत हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घाेडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, तुकाराम रासने आदी यावेळी उपस्थित हाेते. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ताे पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास रासने यांनी व्य्नत केला.