आपल्या भारतात किती तरी प्राचीन वारसास्थळे आहेत. प्राचीन वास्तू आहेत. ज्या बघून आपण आश्चर्यचकित हाेऊन जाताे.त्याचप्रमाणे स्वातंत्र्याेत्तर भारतातही अशा अनेक वास्तू बांधल्या गेल्या आहेत. ज्या वास्तुकलेची उत्तम उदाहरणे आहेत. यापैकी एक म्हणजे दिल्लीतले लाेट्स टेंपल, असं एक मंदिर जिथे काेणतीच मूर्ती नाही.असं मंदिर ज्याचा आकार कमळासारखा आहे. लाेट्स टेंपल हे दिल्लीत आहे. 1986 साली हे मंदिर बांधण्यात आले. 40 मीटर उंच असलेले आणि 27 संगमरवराच्या पाकळ्यांनी तयार झालेल्या या लाेट्स टेंपलला नऊ दारे आहेत. हे नऊही दरवाजे मध्यवर्ती सभागृहाकडे जातात.
या सभागृहामध्ये 2500 लाेक बसू शकतात.लाेक शांतता आणि विश्रांती घेण्यासाठी येथे येतात. सर्व धर्माच्या आणि वंशाची लाेकं या मंदिरात येतात.हे मंदिर आधुनिक काळातील देशातील सर्वाे त्तम वास्तुशिल्पांपैकी एक आहे. या मंदिरात काचेचा पूल आहे. लाेक येथे बसून शांतपणे ध्यान करतात. हे सर्व धर्मांच्या आणि वंशाच्या लाेकांसाठी लाेकप्रिय स्थळ आहे. फरीबर्ज साहबा या इराणीबहाई बास्तुविशारदाने या मंदिराचा आराखडा तयार केला हाेता.