जेव्हा काेणी फुलांचा हार घालते तेव्हा मला वाटतं ‘माझ्यात काही गुण आहे, म्हणून लाेक माझ्याच गळ्यात हार घालतायत.’ पण माझ्यावर जेव्हा चप्पलफेक हाेते तेव्हा मला वाटतं की, ‘काय लाेक सैतान झालेत, अगदी दृष्ट कुठले!’ जेव्हा काेणी आपला सन्मान करतं तेव्हा तादात्म्याला आपण एका पायावर तयार असताे. पण काेणी अपमान केला तर आपण स्वत:च तादात्म्य ताेडायला लगेच तयार हाेताे. दु:खाशी तादात्म्य करायला तर कुणीही तयार नसताे.तरी पण ते हाेतंच. ते यामुळे हाेते की आपण सुखाशी तादात्म्य करू इच्छिताे.सुखाशी तादात्म व्हावं असं आपल्याला का वाटत असतं? जाेवर आपण सुखापासून वेगळे हाेणार नाही ताेवर आपली दु:खाशी फारकत अजिबात हाेणार नाही. जाेवर सन्मानापासून आपण वेगळे हाेत नाही, तुटत नाही, ताेवर आपण अपमानापासून तुटणे, वेगळे हाेणे श्नयच नाही.
जाेवर प्रशंसेतून सुटत नाही ताेवर आपण निंदेतून सुटणार नाही. जाेवर जीवनापासून वेगळेपण नाही ताेवर मृत्यूपासून तरी कसे सुटणार? म्हणून सुखापासून साधकाने सुरुवात करायची आहे.दु:खापासून सारेच सुरू करतात, पण कुणीही दु:खातून मु्नत हाेत नाही. सुखापासून सुरू करायचे, सुखात आपणाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा सुख येईल तेव्हा दूर उभे राहण्याचा प्रयत्न करा. आणि ही माेठी गंमतीची गाेष्ट आहे, सुखापासून लाेक सुरू करत नाहीत, सुखापासून सुरुवात केली तर मग हे फार सरळ आहे साेपं आहे. ही माेठी दुसरी गाेष्ट आपणाला सांगायची आहे. लाेक सुखापासून सुरुवात करत नाहीत, सुखापासून सुरू केलं तर फार सरळ आहे, पण लाेक दु:खापासून सुरुवात करतात. पण असं दु:खापासून सुरू करून नाही भागणार.