
सलग दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील दाेन लाख 65 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. सुमारे 40 हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. हे नुकसान आणि खरीप हंगामातील उत्पादनावर हाेणाऱ्या परिणामांचा आढावाघेण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यातील चांदवड आणि येवला या कांदा उत्पादक तालुक्यांत पाहणी करून आढावा घेतला. या पथकात केंद्रीय फलाेत्पादन विभागाचे अतिर्नित आयु्नत डाॅ. नवीन पाटे, उपायु्नत राहुल बिष्ट आणि अतिर्नित आयु्नत हेमांग भार्गवा यांचा समावेश हाेता. या पथकाने कांदा उत्पादकांशी संवाद साधला. कृषी विभागाच्या कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या पथकाने चांदवड आणि येवला तालुक्यास भेट देत अतिवृष्टीमुळे कांद्यासह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनावर हाेणाऱ्या परिणामांची माहिती घेतली. जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबर या दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीत दाेन लाख 65 हजार 185 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पावसाचा फटका 1519 गावांतील दाेन लाख 83 हजार 506 शेतकऱ्यांना बसला. डाळिंब आणि अन्य बहुवार्षिक फळपिकांचे एक हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.