तुम्ही आता वीस ते तीस वयाेगटात असाल आणि तुमच्यावर कुणी अवलंबून असतील तर जीवन विम्याची शुद्ध पाॅलिसी (एलआयसी टर्म) एक काेटी रुपयांची 30 ते 40 वर्षांसाठी घ्या. त्यासाठी दरवर्षीचा 4000 ते 5000 रुपये म्हणजेच महिन्याला 300 ते 400 रुपये खर्च येईल.
आराेग्य विमा घ्या. त्यासाठी वर्षाला 12,000 किंवा महिन्याला हजार रुपयांचा हप्ता येईल.
तुम्हांला मिळणाऱ्या पगाराच्या 20 ते 30 टक्के रक्कम म्युच्युअल फंड याेजनांच्या एसआयपीमध्ये गुंतवण्यास सुरवात करा. अगदी श्नय असेल तर 50 ते 60 टक्के रक्कम गुंतवण्यास हरकत नाही. जेव्हा तुम्हांला पगारवाढ मिळेल तेव्हा एसआयपीमध्ये वाढ करत रहा.
तुमच्या बचत खात्यात असलेल्या रकमेतून साेन्याची खरेदी करा. साेन्यात काही प्रमाणात गुंतवणूक असावी. जेव्हा साेन्याच्या किंमती घसरतात तेव्हा खरेदी करा आणि वाढल्यावर विका. अगदी तुम्ही साेने घेतल्यावर किंमती घसरू लागल्या किंवा वाढत नाहीत असे झाले तरी काळजीचे कारण नसते. कारण साेने तुमच्या ताब्यात असते.
किंमत घसरणाऱ्या गाेष्टींवर खर्च करू नका. कार, महागडा फाेन, बाजारात नवीन आलेला लॅपटाॅप अशा गाेष्टींवर वायफळ खर्च करू नका.
कधीही क्रेडिट कार्डवर खरेदी करू नका. एखादी गाेष्ट खरेदी करण्यासाठी तुमच्या हातात पैसा नाही याचाच अर्थ ती वस्तू तुम्हांला परवडत नसते.
एकदम घाऊक खरेदी आणि भावाबाबत घासाघीस करण्याची संधी असेल तर त्याचा फायदा घ्या. मात्र त्यासाठी अनावश्यक वस्तू खरेदी करू नका.
स्वतःच्या आराेग्याची काळजी घ्या. वर्षाची फी भरून जिम लावण्यापेक्षा धावणे, चालणे, सूर्यनमस्कार, याेगासने अशा प्रकारच्या व्यायामाला प्राधान्य द्या. राेज किमान 40 मिनिटे व्यायाम करा.
नेहमी स्वतःची कमाई वाढण्यासाठीच्या संधी शाेधत रहा.त्यासाठी स्वतःची काैशल्ये, गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्यशाळा, पुस्तकांची खरेदी, सेमिनार यावर मुक्तपणे खर्च करा.
सहा महिने पगार मिळाला नाही तरी घरखर्च व्यवस्थित चालेल एवढा आकस्मिक निधी हाताशी ठेवा.
दरवर्षी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) 1,50,000 रुपये गुंतवा. त्यावर चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी 8 टक्के व्याज मिळते.