राज्यात पायाभूत सुविधांचा माेठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे.नवीन उद्याेग सहज व कमी कालावधीत सुरू करण्यासाठी केलेल्या धाेरणात्मक सुधारणांची अंमलबजावणी सुरू आहे.राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नांमुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी,’ असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हे देशातील गुंतवणुकीचे मॅग्नेट ठरल्याचे सांगितले.सह्याद्री अतिथिगृहात 20-20 गुंतवणूक संघटना शिष्टमंडळासाेबत बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते.या बैठकीस उद्याेग मंत्री उदय सामंत, उद्याेग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, 20-20 गुंतवणूक संघटनेच्या अध्यक्ष वेरा ट्राेजन उपस्थित हाेत्या.
धाेरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांचा हाेत असलेल्या विकासामुळे महाराष्ट्र हे देशाचे ग्राेथ सेंटर बनले आहे.देशाच्या एकूण डेटा क्षमतेपैकी 60 ट्नके डेटा क्षमता राज्यात आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानीसाेबतच मनाेरंजन, स्टार्ट अपचीही राजधानी आहे. राज्य शासन उद्याेग वाढीबराेबरच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी काम करत आहे. राज्यात बंदरे,जहाज बांधणी व लाॅजिस्टिक क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर राेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. धाेरणात्मक सुधारणा करून या क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. नवीन क्षेत्रांत अधिकाधिक राेजगार निर्मितीसाठी राज्य शासन काम करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.