टाेमॅटाे हे लिंबूवर्गीय फळ आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, ई आणि के मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच पाेटॅशियम, मॅग्नेशियम कॅल्शियम, आयर्न, काॅपर, फाॅस्फरस, झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्यात अँटीऑक्सिडंट गुण सुध्दा आहेत.टाेमॅटाे चा वापर भाजी, आमटी, काेशिंबीर, चटणी, टाेमॅटाे सूप तसेच मांसाहारी पदार्थात आवर्जून हाेताे.टाेमॅटाेला लाल रंग हा त्यातील असलेल्या लाइकाेपीन मुळे प्राप्त हाेताे, जे आराेग्यासाठी फायदेशीर आहे. टाेमॅटाेत कर्बाेदकाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे हाय काेलेस्टेराॅल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारावर फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी एक टाेमॅटाे खाल्ले तर बराच वेळ भूक लागत नाही.
हृदय संबंधित राेगांपासून बचाव हाेताे.
युरिन इन्फेक्शन पासून बचाव व रक्तशुध्दी हाेते.
पालकाच्या रसात टाेमॅटाेचा रस मिसळल्याने बद्धकाेष्ठतेचा त्रास हाेत नाही.
व्हिटामिन के मुळे हाडे मजबूत हाेतात. तसेच बाेन टिश्यू रिपेअर हाेण्यास मदत हाेते.
अँटीऑक्सिंडंटचे भरपूर प्रमाण असलेल्या मुळे व्हिटामिन सी आणि ए असते. व्हिटामिन-ए डाेळ्यांसाठी व डिहायड्रेशनसाठी चांगले असते.
पाचनशक्ती वाढवते.
केसांना चमकदार तसेच मजबूत बनवण्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचेला उजाळा मिळवून देण्यासाठी टाेमॅटाे खाणे चांगले.
बिया नसलेल्या टाेमॅटाेचा सॅलड मध्ये वापर केल्यास किडनी स्टाेनची शक्यता कमी हाेते.
प्रतिकारक्षमता वाढवते. तसेच तणाव पासून दूर राेखण्यासाठी लाभदायक आहे.
स्माेकिंगमुळे शरीराला हाेणाऱ्या नुकसानी पासून वाचवण्यासाठीही टाेमॅटाेचे सेवन फायदेशीर ठरते.
तेलकट त्वचेसाठी टाेमॅटाे एक उत्तम पर्याय आहे.