कमी संकलन झालेल्या र्नतपेढ्यांना र्नत वितरित करा

08 Oct 2025 23:23:33
 

blood 
 
स्वातंत्र्य दिन, गणेशाेत्सव, नवरात्राेत्सव, सेवा पंधरवडा अन्य प्रयाेजनानिमित्त विविध सामाजिक संस्थांनी गेल्या दाेन महिन्यांत राज्यभरात माेठ्या प्रमाणात र्नतदान शिबिरे घेतली.त्यामुळे अनेक र्नतपेढ्यांमध्ये अतिर्नित र्नत संकलन झाले आहे. हे र्नत वाया जाऊ नये यासाठी अतिर्नित र्नत र्नत संकलन करणाऱ्या र्नतपेढ्यांनी उपेक्षित जिल्ह्यांतील र्नत केंद्रांमध्ये चाैकशी करून त्यांना र्नत वितरित करावे, अशी सूचना राज्य र्नत संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) केली आहे.स्वातंत्र्य दिनापासून 2 ऑक्टाेबरपर्यंत राज्यात विविध उत्सवांदरम्यान सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांनी माेठ्या प्रमाणात र्नतदान शिबिरे घेतली. परिणामी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टाेबर या कालावधीत माेठ्या प्रमाणात र्नत संकलित झाले.
 
अतिर्नित र्नत संकलनामुळे र्नत वाया जाण्याचे प्रमाण लक्षात घेता एसबीटीसीने राज्यातील सर्व र्नतपेढ्यांना मागील तीन वर्षांची र्नताची सरासरी मागणी लक्षात घेऊन र्नत संकलन करण्याच्या; तसेच काेणत्याही परिस्थितीत र्नतपेढीमार्फत अतिर्नित र्नत संकलन केल्यानंतर ते मुदतबाह्य हाेऊन वाया जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली हाेती. र्नतदान शिबिर संयाेजकांचे समुपदेशन करून र्नत तुटवड्याच्या कालावधीत र्नतदान शिबिरे आयाेजित करण्याबाबत विनंती करावी,असेही सूचवण्यात आले आहे. मात्र, तरीही काही जिल्ह्यांमधील र्नत केंद्रांमध्ये गरजेपेक्षा जास्त र्नत संकलित झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हे र्नत वाया जाऊ नये यासाठी एसबीटीसीने कमी र्नत संकलित हाेणाऱ्या र्नतपेढ्यांना अतिर्नित र्नताचे वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी र्नत संकलित हाेत असलेल्या भंडारा, गाेंदिया, हिंगाेली, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिराेली व वर्धा या जिल्ह्यांतील र्नत पेढ्यांना अतिर्नित र्नत वितरित करावे, जेणेकरून अतिर्नित र्नताचा याेग्य वापर हाेऊन र्नत वाया जाणार नाही, असे र्नत संक्रमण परिषदेने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0