गरजा वाढल्या की, घरातील सामान वाढू लागते. हा वाढता पसारा कल्पकतेने आवरला की, बंदिस्त करता येऊ शकताे. रॅक्सला आपण सारख्या आकाराचे कप्पे करून घेताे, पण सर्वच वस्तू सारख्या आकाराच्या नसतात. काही वस्तू छाेट्या असतात तर काही वस्तू माेठ्या. यासाठी सारख्या आकाराचे कप्पे करण्याऐवजी ते वस्तूंच्या आकारमानानुसार लहान-माेठे करावेत. यामुळे तेवढ्याच जागेत जास्त कप्पे हाेतात व जास्त वस्तू ठेवता येतात.हीच बाब ड्राॅवरचीही. त्यातही लहान-माेठ्या वस्तुंची गर्दी हाेत असते आणि वेळेवर हवी ती वस्तू सापडत नाही. यासाठी एकाच ड्राॅवरमध्ये लहान-माेठे कप्पे करून घ्यावेत. प्रत्येक कप्प्यात एकसारख्या आकाराच्या वस्तू नीटनेटक्या ठेवाव्यात.
यामुळे लहान-माेठ्या वस्तुंची गल्लत हाेत नाही. हवी ती वस्तू चटकन सापडते. पातेली, ताटे, वाट्या, भांडी, कपबशा, डिशेससाठी निरनिराळ्या आकाराचे अॅल्युमिनियम वा स्टीलचे स्टँड आपल्या गरजेनुसार खरेदी करावेत. त्यात किचनमधील अनेक वस्तू बसू शकतात. त्रिकाेणी आकाराचे खाली चाके असलेले ्री स्टँडिंग स्टाेअरेज युनिट घ्यावे. त्यामध्ये ग्लास, चहाची उपकरणे, चमचे व बाटल्या ठेवता येतात. चाकांमुळे हा स्टँड काेठेही हलवता येताे. हे युनिट सेंटर टेबलचेही काम करते.काॅटखाली ड्राॅवस करून त्यात मुलांची खेळणी, वह्या-पुस्तके, स्कूलबॅग इ. साहित्य ठेवता येते. काॅटच्या खालच्या बाजूस ड्राॅवर्स करून त्यात बूट-चपला, पाॅलिश, ब्रशेस, साॅक्स ठेवण्याची साेय करता येते.
साेफ्याच्या खाली सरकते ड्राॅवर्स केल्यास त्यात वर्तमानपत्रे, मासिके, अंथरुण-पांघरूण, उशा वगैरे ठेवता येतात. हेडबाेर्डमध्ये पेले,डिशेस, तत्सम वस्तू ठेवता येतात.लहान मुलांच्या बंक बेडला जाेडूनच उघडे शेल्फ बनवून घ्यावे.बंक बेडमध्ये दाेन मुलांची झाेपण्याची साेय हाेते तर शेल्फच्या कप्प्यात मुलांची खेळणी, खेळाचे साहित्य, अंथरूण-पांघरूण घड्या घालून तसेच उशाही ठेवता येतात.प्रवेशदाराच्या पाठीमागे कपाट करून दाराजवळ इतस्तत: पसरणारा बराच पसारा ठेवता येताे. जिन्याखालील जागा निरुपयाेगी न ठेवता बऱ्याच दिवसांनंतर लागणारे सामान त्या जागेत ठेवता येते. कपड्यांच्या काहीशा उंच व रुंद कपाटात कपड्यांसाेबतच काही बॅग्ज, ब्रीफकेसेस, सॅक्स, बेल्टस ठेवता येतात. कल्पकता वापरून घर आवरले तर 90- 95 टक्के पसारा नक्कीच व्यवस्थित ठेवता येईल.