अपेक्षांच्या ओझ्याखाली बालपण हरवू देऊ नका

04 Oct 2025 23:32:15
 

child 
 
सर्व आई-वडिलांची इच्छा असते की, आपली मुले आज्ञाधारक असावीत व त्यांनी आपली प्रत्येक गाेष्ट ऐकावी.हा विचार तसा वाईट नाही पण त्यासाेबत याचाही विचार करायला हवा की, आपल्यात व आपल्या मुलांमध्ये पूर्ण एक पिढीचे अंतर आहे आणि दर पिढीत विचार बदलत आले आहेत. अशावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर मुलांचे विचार आपल्या आई-वडिलांपेक्षा वेगळे असू शकतात. एखाद्या विषयावर आपले मत बनवणे वा आवड-नावड सांगणे मुलांच्या मानसिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा असताे.यासाठी नेहमी स्वत:चेच खरे सिद्ध करण्याऐवजी मुलांना स्वत:चे मत बनवण्याची व व्यक्त करण्याची संधीही द्यायला हवी.
 
इतरांसारखे बनण्याचे प्रेशर काही मुले अत्यंत चंचल असतात, तर काही शांत स्वभावाची असतात. याचप्रमाणे काही अत्यंत बाेलकी असतात तर काही कमालीची लाजाळू असतात.मुलांच्या स्वभावात एवढा जास्त फरक असताे की, कित्येकदा एकाच दांपत्यांच्या दाेन मुलांमध्ये जमीन-आसमानाचा फरक दिसताे. अशावेळी कधीही आपल्या मुलावर दुसऱ्यासारखे हाेण्याचा दबाव टाकू नये. मुलांमध्ये उत्तम गुण विकसित करण्याकडे अवश्य लक्ष द्यायला हवे पण साेबतच हेही पाहायला हवे की, त्याचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारचे आहे. इतरांशी तुलना केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी हाेताे हे लक्षात ठेवावे. याऐवजी त्यांना निराेगी व मुक्त वातावरण द्यावे जेणेकरून त्यांचा विकास याेग्यप्रकारे हाेऊ शकेल.
 
सामाजिक बनवण्याचे दडपण लहान मुले खूप लवकर आपल्या आजुबाजूच्या वातावरणात मिसळतात व प्रत्येक नव्या गाेष्टीसाठी उत्सुक असतात. पण जसजसे मूल वाढू लागते तसतसा त्याच्या वागण्यात बदल हाेऊ लागताे. किशाेरावस्थेत तर बरीचशी मुले फक्त मित्रांसाेबतच सामान्य हाेतात. पण याचा अर्थ ते इतरांना पसंत करीत नाही असा नाही.वास्तविकक हे सारे वयाचे वेगवेगळे टप्पे असतात. जे आपण सहजतेने घ्यावेत.मुलांवर विनाकारण इतरांना भेटण्याचा दबाव टाकण्याऐवजी त्यांच्या पसंतीचा मान राखणे उत्तम ठरेल.भावना व्यक्त करण्यावर बंदी जरी आपण आपल्या मुलांना एक उत्तम जीवन देण्याचा श्नय तेवढा प्रयत्न करीत असला तरी याचा अर्थ हा नव्हे की या साऱ्याच्या बदल्यात ताे आपल्यासमाेर हसतखेळत राहील.
Powered By Sangraha 9.0