श्री सिद्धिविनायक चरणी अर्पित अलंकारांचा आज जाहीर लिलाव केला जाणार

03 Oct 2025 15:49:04
 
 si
मुंबई, 1 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
 
श्री सिद्धिविनायक चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सुवर्णालंकारांचा (श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार इ.) जाहीर लिलाव दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर गुरुवार 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावादिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. सदर प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमांप्रमाणे होईल. सोन्याच्या अलंकारांचा लिलाव आणि चांदीच्या नाण्यांच्या विक्रीसंबंधित सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या भक्तांनी लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.
Powered By Sangraha 9.0