काळी जोगेश्वरी मातेची भजनसुधा कला मंडळ, सांगवीतर्फे भजनसेवा

03 Oct 2025 16:21:30
 
 ka
पुणे, 1 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
 
बुधवार पेठेतील पेशवेकालीन काळी जोगेश्वरी मातेला सोमवार दि. 29 सप्टेंबर अष्टमीनिमित्त भजनसुधा कला मंडळ, सांगवीच्या मीनल देशपांडे आणि सहकारी यांच्यातर्फे भजनसेवा रुजू करण्यात आली. यामध्ये त्यांनी आईचा विडा, जोगवा, आईचा जागर अशा अनेक रचना सादर केल्या. असंख्य श्रोत्यांनी या भजनसेवेचा लाभ घेतला. काळी जोगेश्वरीचे पुजारी भिडे परिवाराच्या वतीने भजनी मंडळाचा यथोचित सन्मान केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या दहाड आणि अनिता कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0