ओशाे - गीता-दर्शन

23 Oct 2025 22:03:17
 

Osho 
 
नाहीतर ताे माणूस दुभंगून, फुटून, तुटून, विस्फाेटून खलासच हाेऊन जायचा, नष्टच हाेऊन जायचा. जाे एका रुपयाने चळताे, एखादा रुपया रस्त्यावर पडून हरवला तर ताे माेठ्या अडचणीत सापडताे, तर त्याच्या जीवनात एवढी माेठी घटना ताे पेलू शकणार नाही.
ताे आतून अजून इतका क्रिस्टलाइज्ड संघटित नाहीये.इतका श्नितवान नाहीये की परमात्म्याला पेलू शकेल.त्याची अजून ती तयारी झालेली नाही. त्याच्यात अजून ती पात्रता आलेली नाही.सगळं काही नियमानं घडतं. आपण ज्या दिवशी स्वाधीन व्हायला पात्र व्हाल, त्याच दिवशी परमसत्ता आपणांमध्ये अवतरित हाेते. ती सदाचीच तयार असते असं उतरायला. पण आपण इत्नया क्षुद्र गाेष्टींमध्ये डाेलता आहात, डगमगता आहात की त्याचा हिशेबच नाही! कधी कधी जरा हिशेब करीत चला, की आपल्याला काेणकाेणत्या क्षुद्र गाेष्टी कशा कशा पळवतात! रस्त्यानं जाताना दाेन माणसं जाेरानं हसतात आणि आपलं कंपन व्हायला तेवढं पुरेसं असतं.
Powered By Sangraha 9.0