आकर्षक व्य्नितमत्त्वातील गुण कसे ओळखाल?

21 Oct 2025 22:12:51
 
 

Health 
 
 
अशा व्यक्ती कधीच खुल्या मनाने कुणाशी बाेलू शकत नाहीत. त्यांना जे सांगायचे आहे ते तुमच्या मनावर ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. याउलट खुल्या मनाच्या व्यक्ती आधी दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेतात. त्याला कशाची आवड आहे, काय करायचे आहे याचा अंदाज घेऊन दाेघांच्या समान आवडीच्या विषयांवर बाेलू लागतात.
 
स्मितहास्य: आकर्षक किंवा लाेकांना आपल्याकडे खेचून घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असते.
 
परिपूर्ण नसल्याचा सांगावा:आपल्यापैकी प्रत्येकामध्ये काही त्रुटी आणि उणीवा असतात. त्या आपण लपवण्याचा प्रयत्न करत असताे. त्यामुळेच असाच प्रयत्न करणाऱ्यांशी आपण सहजपणे जाेडले जाताे. उणीवा असलेल्या अहंकारी व्यक्तींपासून आपण आपाेआपच लांब राहताे. स्वतःमधील अपरिपूर्णता आणि उणीवांना घाबरू नका. त्याऐवजी स्वतःमधील उणीवा माहित आहेत ही गाेष्ट सगळ्यांना समजली पाहिजे. मग ते त्यांच्याही उणीवा तुम्हांला सांगतील आणि सगळे मिळून हसण्याचा आनंद घ्याल आणि मग तुम्ही एकमेकांशी घट्ट जाेडले जाण्याची प्रक्रिया सुरु हाेईल.
 
शुभेच्छांची पेढी:काैतुक करण्याची गरज नसते पण, खराेखरच काैतुकास्पद कामगिरी असेल तर त्या व्यक्तीचे काैतुक ताेंड भरून करावे. त्यामुळे आपला मित्र परिवार वाढत जाताे.
Powered By Sangraha 9.0