कार्तिकी यात्रेसाठीची कामे पूर्ण करा; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे निर्देश

20 Oct 2025 13:05:12
 
 

Kartiki 
कार्तिकी यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या साेयीसुविधांबाबत स्थानिक प्रशासनाच्या नियाेजनाच्या बैठका सुरू आहेत. साेलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत बैठक घेऊन 27 ऑक्टाेबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. कार्तिकी एकादशी 2 नाेव्हेंबरला आहे. त्यामुळे वारीच्या नियाेजनासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. कार्तिकी वारीसाठी जवळपास 5 ते 6 लाख भाविक येतात. या वारीच्या नियाेजनाबाबत येथील प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनीही या नियाेजनाची बैठक घेतली. बैठकीत महापालिका, पाेलीस, मंदिर समिती, आराेग्य विभाग, वीजवितरण, अन्न व भेसळ प्रशासन आदी कार्यालयीन प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना नियाेजित कामांची माहिती दिली. यात काही बदल सुचवत सर्व कामे 27 ऑक्टाेबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले. शहरातील अतिक्रमणे, चंद्रभागा पैलतीरावरील 65 एकर जागेतील स्वच्छता, सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था अशी अनेक कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. कार्तिकी वारीसाठी भाविक दिवाळीच्या सुटीतच पंढरीत येतात.
 
Powered By Sangraha 9.0