दिवाळीत शुभलाभासाठी अशी करा राेषणाइ

20 Oct 2025 13:12:38
 

diwali 
 
दिवाळीत फॅन्सी लाइट लावण्याची माेठीच फॅशन आहे.जर ती लाइट वास्तुदाेषांचे निवारणही करीत असेल तर साेन्याहून पिवळे म्हणता येईल. प्रत्येक दिशेसाठी त्यानुरूप रंगाची लाइट लावणे आपल्याला उत्तम परिणाम देत असते.
 
उत्तरेला निळा प्रकाश : जर आपण आपले ध्येय गाठण्यात यशस्वी हाेत नसाल, याेग्य मार्ग सापडत नसेल तर आपण आपल्या घराच्या ईशान्य झाेनमध्ये निळ्या लाइट लावा. हा झाेन मेंदूच्या स्पष्टतेचा व बुद्घिमत्तेचा झाेन आहे.
 
पूर्वेला हिरवा रंग शुभ : हिरवा रंग आपल्याला समाजाशी जाेडताे. आपल्याला आपल्या सर्व समस्यांचे उत्तरही दिसू लागेल. यासाठी घराच्या राेषणाईत हिरवा रंग पूर्वेला ठेवा.दिवाळीत मिळालेल्या भेटवस्तूही याच दिशेला ठेवा.
 
दक्षिणेला लाल करील कमाल : आपल्याला आपल्या कष्टाप्रमाणे फळ मिळत नाही, लाेकांकडून प्रशंसा हाेत नाही असे वाटते का? अशी परिस्थिती असेल तर घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचा प्रकाश करा. जर लाल बल्बचा प्रकाश घराच्या आग्नेय दिशेला कराल, तर त्यामुळे अडलेले धनही मिळेल.
 
श्चिमेचा पांढरा रंग वाढवील बचतीचा ओघ : घराच्या पश्चिम भागात पांढऱ्या रंगाचे दिवे लावल्यास आश्चर्यजनक लाभ हाेईल. घरात धनसंचयाची प्रवृत्ती वाढेल व खर्च नियंत्रणात येतील.
 
घरात सकारात्मकतेचा प्रवाह वाढवा
 
 देवघरात लाल रंग नसावा. जर देवघरात लाल रंग असेल, तर ताे त्वरित हटवावा. कारण देवघरात लाल रंग असल्यास सकारात्मक शक्तींचा ऱ्हास हाेत असताे.
 
 जर आपण आपल्या घरात सजवण्यासाठी एखादा फाेटाे वा चित्र खरेदी करीत असाल, तर चित्रात भरपूर हिरवीगार झाडे व मनाला आनंद देणारे दृश्य असावे.ही चित्रे घराच्या पूर्वेकडील िंभंतीवर लावावीत यामुळे सामाजिक रूपात संपर्क वाढताे.
 
 जर घरात सजवण्यासाठी एखादा आयटम खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर या दिवाळीत धावत्या लाल घाेड्यांची जाेडी खरेदी करावी. जर आप ती दक्षिणेकडे ठेवली, तर आपल्या घरात धनाचे आगमन हाेईल.
 
Powered By Sangraha 9.0