भाजपने बाेगस मतदार नाेंदी करत मतचाेरी केल्याचा आराेप

20 Oct 2025 13:10:24
 

BJP 
 
बनावट कागदपत्रांद्वारे विविध मतदारसंघांमध्ये बाेगस मतदार नाेंदणी करून त्या मतदारांची आधारकार्ड सारखी बाेगस ओळखपत्रे काढून मतदान घडवून आणता येऊ शकते, असा आराेप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार राेहित पवार यांनी केला आहे. यासाठी त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेतच एका फेक वेबसाइटवरून च्नक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढून प्रात्यक्षिक दाखवून खळबळ उडवून दिली आहे.आमदार राेहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मतचाेरीचे गंभीर आराेप केले. पवार यांनी आज पत्रकार परिषदेत च्नक अमेरिकेचे अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड दाखवले. ट्रम्प यांचे जसे आधारकार्ड काढले आहे तसे अनेकांनी आधारकार्ड काढले असेल आणि त्या आधारावर मतदार ओळखपत्र बनवले असेल, असा दावा राेहित पवार यांनी केला; तसेच विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये किती मतदार वाढले, याची सविस्तर माहिती देत मतचाेरीचे गंभीर आराेप केले. पवार यांनी या आराेपांनंतर काही मागण्यादेखील केल्या आहेत.
 
शिरूर विधानसभा मतदारसंघात 10 हजार 230, वडगाव शेरीत 11 हजार 64, खडकवासला येथून 12330, पर्वती मतदारसंघात 8 हजार 238, हडपसर मतदारसंघात 12 हजार 798 अशी 54000 नावे वाढवली आहेत. आमचे कार्यकर्ते तिथे माणसे शाेधायला गेली; पण एक सुद्धा माणूस तिथे सापडला नाही.अशाेक पवार यांनी जसे सांगितले की, बसने तिथे लाेकं आणली. तिथे मतदान करून घेतल्यानंतर परत त्यांना बसने पाठवले. पैसे देऊन लाेकांना मतदानासाठी आणले. मतदान करून घेतले आणि परत त्यांच्या मतदारसंघात पाठवले. मी पिंपरीचे उदाहरण दाखवले. तिथे 54 हजार मतदारांचा घाेळ झालेला आहे,असा आराेप राेहित पवार यांनी केला.यासाठी मेथडाेलाॅजी डिझाइन केली गेली. देवांग दवे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मेथडाेलाॅजीचा वापर केला. किती लाेकांना काढायचं, कुणाला काढायचं, कुणाला घालायचं, टाेटल काे-ऑर्डिनेशन त्यांनी केले, असा आराेप पवार यांनी केला. निवडणूक आयाेग ही एक स्वायत्त संस्था आहे.
 
या स्वायत्ता संस्थेचे इंटरनेट आणि त्यांची वेबसाइट सांभाळण्याची जबाबदारी देवांग दवे नावाच्या व्य्नतीला निवडणूक आयाेगाने दिली आहे. निवडणूक आयाेगाच्या वेबसाइटवर सर्व माहिती असते. दवे भाजपचा पदाधिकारी असेल, तर आमच्या आधी दवे यांच्याकडे सर्व माहिती हाेती.यादीत कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाव काढायचं हे दवेंनी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केलं, असा गंभीर आराेप राेहित पवार यांनी केला.एवढी माेठी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाइटच्या माध्यमातून मिळत असेल, आम्ही जेव्हा मागताे तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की देत नाही.आमच्या नेत्यांना सांगितलं जातं की, ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिलं पाहिजे. अचानक वाढलेले मतदार हाेते कुठले आणि कसे आले, याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.
 
डिजिटल मतदार याद्या देण्यात याव्यात.बीएलाेच्या डायरी नाेंदी कशा झाल्या याची माहिती मिळायला हवी; तसेच येणाऱ्या निवडणुकीत ते कसे हाेणार आहे, याचीदेखील माहिती आम्हाला हवी आहे. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही हवे आहे. शेवटच्या तासात 68 लाख लाेकांनी मतदान केलं. मग ते काेण हाेते ते आम्हाला बघायचं आहे, असंही ते म्हणाले.लाेकसभा आणि विधानसभा निवडणूक या काळात सर्वांत जास्त मतदान हे पनवेलमध्ये वाढले आहे. इथे 65 हजार मतदार वाढले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये 57 हजार, भाेसरीत 56 हजार, मीरा-भाईंदर 53 हजार, नालासाेपारा 50 हजार, चिंचवड 45 हजार, हडपसरमध्ये 43 हजार अशा संख्येत सहा महिन्यांत मतदार वाढल्याचा दावा राेहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
Powered By Sangraha 9.0