म. गांधी संकलित वाङ्मय भाग दाेनचे अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन

17 Oct 2025 22:32:03
 

MG 
 
महात्मा गांधी यांनी 1931 ते 1948 या कालखंडात केलेला पत्रव्यवहार, नवजीवन, यंग इंडिया, तरुण भारत, बाॅम्बे क्राेनिकल, हिंदुस्तान टाइम्स आदी नियतकालिकांतील लेखांचा समावेश असलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग 2 (खंड 51-98) चे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले. राज्य शासनाच्या दार्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग 2 मध्ये गांधीजींची स्फूर्तिदायक कहाणी, त्यांचा व्यक्तिविकास, त्यांनी केलेल्या कार्यांचा वृत्तांत त्यांच्या स्वत:च्या लेखनाद्वारे व भाषणांद्वारे सांगितला गेला आहे. महात्मा गांधींची त्यांच्या लिखाणातून दिसून येणारी विचारप्रणाली समाेर यावी या हेतूने या वाङ्मयाचे भाषांतर प्रादेशिक भाषांत करण्यात आले आहे. एकूण 61 खंड मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0