1. डाग जाेरात घासणे : यामुळे डाग जास्त गडद हाेतात आणि कापडही खराब हाेते. डाग घासू नये. पांढऱ्या फड्नयाने दाबून साफ करण्याचा प्रयत्न करावा.
2. गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट : डिटर्जंट जास्त घेतले तर तेही कापडाच्या मळ व घाणीसाेबत चिकटून राहील. यामुळे बॅ्नटेरिया वेगाने उत्पन्न हाेऊ शकताे.एक बादली कपड्यांसाठी अर्धा चमचा डिटर्जंट खूप असताे. तरीही कपडे व्यवस्थित धुतले गेले नाहीत, तर डिटर्जंटचे प्रमाण वाढवू शकता.
3. ड्राय्नलीनचे लेबल असलेले कपडे धुणे : बहुतेक कपडे ज्यावर ड्राय्नलीन लिहिलेले असते. त्यांना हँडवाॅश करून एअरड्रायही करू शकता. यामध्ये लिननसारखे नैसर्गिक फायबर सामील करू शकता.कपड्यांचा कलर फास्टनेसही चेक करावा. लेदर सुएड, सिल्क वा एंबेलिश्ड कपडे व ब्लेझर्ससाठी ड्राय्नलीनिंग बेस्ट असते.
4. झिपर्स झिप न करणे : एकाच लाेडमध्ये मेटल झिपचे कपडे टाकले असतील, तर ते डेलिकट कपड्यांचे नुकसान करू शकते. मशीनमध्ये टाकण्यापूर्वी झिपर बंद करा.
5. बटन केलेले शर्ट्स धुणे : हे ऐकायला चांगले वाटू शकते, पण यामुळे कपड्यांचे नुकसान हाेते. कपडे ताणले जातात. बटन तुटू शकते. मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी त्यांची बटने खाेलावीत.