दिलखुलासमध्ये डाॅ. विजय ठाकरे यांची मुलाखत

17 Oct 2025 22:37:41
 
 

Interview 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘न्यायसहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळा संचालनालयाचे कामकाज आणि स्वरूप’ या विषयावर संचालनालयाचे संचालक डाॅ. विजय ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत शुक्रवार (17), शनिवार (18) आणि साेमवारी (20 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, तसेच News On AIR या माेबाइल अ‍ॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत डाॅ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे. राज्य शासनांतर्गत कार्यरत असलेली न्यायसहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळा संचालनालय ही संपूर्ण देशातील जुन्या संस्थांपैकी एक आहे. निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांच्या शास्त्रीय विश्लेषणाचे कार्य या प्रयाेगशाळांत केले जाते.
 
सध्या पाेलिसांसमाेर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. त्यानुसार तपासासाठी असलेल्या यंत्रणेतही बदल हाेणे आवश्यक हाेते. जलद गतीने तपास पूर्ण हाेण्यासाठी ‘माेबाइल फाॅरेन्सिक व्हॅन’ची (न्यायसहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळा) सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र माेबाइल फाॅरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या उपक्रमामागील संकल्पना, प्रमुख उद्दिष्ट आणि संचालनालयाचे कामकाज कशा प्रकारे सुरू आहे, याविषयी दिलखुलासमधून डाॅ. ठाकरे यांनी माहिती दिली आहे.
Powered By Sangraha 9.0