
आजकाल मुलांमध्ये अत्यंत कमी वयात स्थूलत्व, मधुमेह या सारखे गंभीर आजार हाेऊ लागले आहेत. या गंभीर आजारांचे माेठे कारण मुलांचे खाणे-पिणे आहे.‘फूड फ्निस’चे लेखक डाॅ. मार्क हायमन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, आम्ही मुलांना कशाप्रकारचा आहार देत आहाेत याचा सरळ संबंध त्यांच्या मूड, बिहेवियर आणि व्हायलेंसशी असताे.चुकीचा आहार मुलांच्या मानसिक आराेग्याचेही नुकसान करीत आहे. त्यांच्यात असे आजार उद्भवू नयेत व माेठे हाेऊन ते समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी प्राॅड्निटव्ह काम करू शकतील यासाठी त्यांना लहानपणापासून हेल्दी डाएटची सवय लावा व त्यांना हेल्दी इटर बनवा. दिल्लीत मेडिकल वर्ल्ड फाॅर यूच्या न्यूट्रीशनिस्ट डाॅ. शैली ताेमर यांच्या मते, पालक जर मुलांना लहानपणापासून हेल्दी इटिंगविषयी सांगत असतील, तर ते माेठे हाेऊन जेव्हा घराबाहेर शिक्षण वा नाेकरीसाठी जातील तेव्हा सकस खाण्या-पिण्याच्या सवयी अवलंबतील. या सवयी त्यांना आयुष्यभर सुदृढ ठेवतील.डिजिटलायझेशन वाढल्यामुळे फिजिकल अॅ्निटव्हिटीज कमी झाल्या आहेत. अशावेळी मुलांना पाैष्टिक आहार देणे व त्यांच्या खाण्याच्या सवयीवर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यांच्या साेबत हेल्दी फूडविषयी सतत बाेलावे.स्वयंपाकात त्यांची मदत घ्यावी.जेणेकरून स्वयंपाक करायला किती श्रम पडतात हे त्यांना समजून येईल.