करवा चाैथनंतर 12 नववधू गायब

    17-Oct-2025
Total Views |
 
 
 
bride
 ुकतंच करवा चाैथचं व्रत करण्यात आलं. हे व्रत महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात. हे व्रत त्या 12 जणींनी पण आपल्या नवऱ्याची प्रगती, यश आणि दीर्घायुष्यासाठी केलं. दिवसभर पाण्याचा एक घाेट पण घेतला नाही.संध्याकाळी नववधूचा शृंगार करून त्यांनी चंद्राचे दर्शन घेतले. नवऱ्याच्या हाताने पाणी ग्रहण केलं. त्यानंतर कुटुंबासाेबत जेवण्याचा आनंद घेतला. पण सकाळी उठल्यावर 12 कुटुंबांना जाेरदार धक्का बसला आहे. कारण या 12 जणी रात्री घरातून पळून गेल्या आहेत. ही धक्कादायक घटना बिहारच्या अलिगडमधील असून, परिसरात खळबळ माजली आहे. ध्नकादायक गाेष्ट म्हणजे करवा चाैथ व्रत केल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाच्या अन्न आणि पेयांमध्ये गुंगीचं औषध मिसळलं, ज्यामुळे घरातले सर्व जण बेशुद्ध पडले.
 
सकाळी कुटुंबांतील लाेकांना जाग आली तेव्हा घरातल्या वविध कुटुंबांतील 12 नववधू गायब झाल्या हाेत्या. दागिने, राेख रक्कम आणि इतर सामान घेऊन त्या पळून गेल्या हाेत्या.मिळालेल्या माहितीनुसार फरार महिला बिहारच्या असल्याचे सांगितले जात आहे, तर त्यांचं लग्न लावणारा मध्यस्थही फरार आहे.12 कुटुंबांपैकी 4 कुटुंबांनी पुढे येत पाेलिसांकडे तक्रार केली आहे. पाेलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कुटुंबे इग्लासमधील एका मध्यस्थाच्या संपर्कात आली. इग्लास परिसरातील रहिवासी सचिन नावाच्या एका व्यक्तीमार्फत त्यांची त्या मध्यस्थाशी ओळख झाली असल्याचे वृत्त आहे. मुली त्याच्या घरी राहत असल्याचेही सांगण्यात येत आहेइग्लासमधील कैलाश नगर येथील रहिवासी वीर सिंग यांनी सांगितलं, की त्यांनी एका संपर्काद्वारे इग्लासमधील मध्यस्थाशी संपर्क साधला.
 
त्यानंतर, प्रेमवीरचे लग्न मनीषा नावाच्या मुलीशी ठरवण्यात आलं हाेतं. त्यांनी शुक्रवारी, करवा चाैथच्या दिवशी हाथरस येथे काेर्ट मॅरेज केलं. त्याची बहीण आरती देवी आणि मेहुणे आर्यन सिंग साक्षीदार हाेते. त्यांच्या आधार कार्डवर बिहारमधील राेहतास जिल्ह्यातील मंगराव हे गाव दाखवले आहे. घरी परतल्यावर, प्रेमवीर आणि मनीषा यांना वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिला.करवा चाैथ सणासाेबतच झालेला हा विवाह साेहळा सर्व विधींसह पार पडला. या सणासाठी नववधूने साेन्याचे कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या आणि इतर दागिने घातले हाेते. उत्सवानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले आणि झाेपी गेले. सकाळी उठल्यावर पाहिले तर मनीषा गायब हाेती. त्यांनी सगळीकडे शाेध घेतला पण नववधू कुठेही सापडली नाही. ती दागिने घेऊन फरार झाल्याचे आढळून आले.
 
9 ऑक्टाेबर राेजी बिहारची रहिवासी असलेली शाेभा हिचे लग्न सासनीगेट परिसरातील दाैलत वाली माता जवळील मथुरा राेड येथील रहिवासी निहाल शर्मा यांचा मुलगा प्रतीक शर्मा याच्याशी झाले हाेते. त्यांच्याकडून अनेक वेळा ऑनलाइन 1.20 लाख रुपये काढून घेण्यात आले.सकाळी शाेभा घरी दिसली नाही आणि तिने झाेपण्याआधी घातलेले दागिनेही गायब हाेते.माजी महापाैर शकुंतला भारती म्हणाल्या की, इग्लासमधील भाैरा जैथाैली येथील रहिवासी काळू आणि सुंदर यांचे लग्न एकाच मध्यस्थामार्फत झाले हाेते. त्याच मध्यस्थाला या कुटुंबांकडून प्रत्येकी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली.त्या म्हणाल्या, की ऑनलाइन व्यवहारादरम्यान ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले हाेते ताे मुस्लिम असल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे इतर आठ कुटुंबे प्रभावित झाली आहेत. परंतु सामाजिक कलंकामुळे ते पुढे येण्यास कचरत आहेत.