नव्याने सुरू करण्यात आलेल्या साेलापूर-मुंबई विमानसेवेमुळे साेलापूर परिसरातील औद्याेगिक विकासाला गती मिळेल. पर्यटन क्षेत्राला चालना मिळून राेजगाराच्या नव्या संधी निर्माण हेातील.येत्या काळात साेलापूरला नाइट लँडिंग सुविधा व बाेइंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.साेलापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ करताना ते बाेलत हाेते. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, साेलापूरचे पालकमंत्री जयकुमार गाेरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पाेलीस आयुक्त एम. राजकुमार, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घाेडावत, एअरपाेर्ट अॅथाॅरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी यावेळी उपस्थित हाेते.साेलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण हाेत असून, ही साेलापूरकरांना दिवाळीची भेट आहे.
विमानसेवेच्या माध्यमातून साेलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जाेडले जात असल्याने उद्याेग-शेती विकासाला चालना मिळून राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील. येत्या काळात हैदराबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जाेडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही माेहाेळ यांनी दिली.साेलापूर-तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे, अशी अपेक्षा गाेरे यांनी व्यक्त केली. यावेळी बालाजी आमाईन्सच्या वतीने एक काेटींचा धनादेश, साेलापूर बाजार समितीच्या वतीने 25 लाख आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकाेटतर्फे 21 लाख व दुधनी बाजार समितीच्या वतीने 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.बार्शी, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग आणि माेहाेळच्या नूतन पाेलीस स्थानकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. पहिले प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाेर्डिंग पास देण्यात आला.