नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली

17 Oct 2025 22:34:16
 

Adhiveshan 
 
विधानसभेच्या नागपूरमधील आगामी हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन व्यवस्थेबाबत नियाेजनबद्ध व काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.नागपूरचे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर, महापालिकेच्या सह आयुक्त वसुमना पंत, पाेलीस अधीक्षक हर्ष पाेद्दार, वाहतूक पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजुसिंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
 
अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यकनिवास व्यवस्था आणि वाहन व्यवस्थेसंदर्भात विषयनिहाय सविस्तर चर्चा झाली. या दाेन्ही व्यवस्थांनी चाेख नियाेजन करून काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या, तसेच दूरध्वनी, इंटरनेटची अद्ययावत व्यवस्था उभारण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. अल्पाेपाहार व भाेजन व्यवस्था देताना खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण व याेग्य नियंत्रण ठेवण्याचे निर्दे शही त्यांनी दिले.सुयाेग येथे फक्त पत्रकारांची निवास व्यवस्था, तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था वनामती येथे करण्यास या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. सुरक्षा उपाययाेजनांवरही बैठकीत चर्चा झाली.
Powered By Sangraha 9.0