दाेस्त, जीवनसाथी वा कुटुंबातील एखाद्यासाेबत वाद हाेणे ही अत्यंत साधी गाेष्ट आहे. वाद सर्वांसमक्ष असाे वा बंद दारामागे असाे याेग्य पद्धतीने माफी मागण्याची कला आल्यामुळे जीवनात प्रभावीपणे पुढे जाणे साेपे हाेते. मॅनहटन मेंटल हेल्थ नावाच्या संस्थेत मेंटल हेल्थ ए्नसपर्ट स्टीफन एल. बुचवाल्ड यांच्याा मते एका माणसाच्या रुपात आपण सारे काही लाेकांसाेबत कने्नशन स्थापित करू इच्छित असताे. पण बऱ्याचदा आपला अहंकार हे संबंध जाेडण्यात आडवा येत असताे.एखाद्याची माफी मागणे याचा अर्थ हा नाही की समाेरचा महन आहे व आपण तुच्छ. याेग्य पद्धतीने माफी मागितल्यामुळे नात्यातील दरी कमी हाेते व ती आपसातील जी दाेघांच्याही मनात ठसठसणारी जखमही भरते. माफी मागणे खरे तर समाेरच्यासाेबतच स्वत:च्या भावनांचाही आदर करणे आहे. प्रभावीपणे माफी मागण्याच्या खालील पद्धती आहेत.
विचार करण्यासाठी वेळ घ्या जीवनसाथी वा दाेस्तासाेबत एखाद्या गाेष्टीवरून तिखट वाद झाला. रागात आपण समाेरच्याला भरपूर उलटसुलट ऐकवले. पण वाद संपल्यानंतर आपण त्वरित समाेरच्याची माफी माफीही मागता का? जर उत्तर हाे असेल तर आपली ही सवय बदला. थाेडे थांबा. भांडण वा वाद हाेताच त्वरित माफी मागितल्यास समाेरच्याला हे वाटू शकते की, आपण मनापासून माफी मागत नाही तर हे संकट टळावे व वातावरण सामान्य व्हावे यासाठी माफी मागत आहात.तू ऐवजी मी चा वापर माफी मागताना समाेरच्याला कमी दर्शवण्याचा प्रयत्न करण्याची चूक कधीही करू नका.समाेरच्यात दाेष काढणे आपले लक्ष्य नसते.अशावेळी माफी मागताना ‘तू काहीही उलटसुलट बाेलत राहात हाेती’ ऐवी असे म्हणा की, आपल्या बाेलण्यात मी माझ्या भावना याेग्य प्रकारे राखू शकलाे नाही.
यामुळे सारे ध्यान आराेप-प्रत्याराेप करण्याऐवजी भावनांवर राहील आणि समाेरच्याला हे जाणवेल की आपण खराेखरच मनापासून माफी मागत आहात.समस्येचे समाधान करा भांडण झाले, आपल्या दाेघांपैकी एकाने माफी मागितली आणि जीवनाची गाडी पुन्हा चालू लागली. पण काही दिवसांनंतर आपले पुन्हा त्याच मुद्यावर भांडण हाेईल. जर असे असेल तर याेग्य संधी पाहून आपण समाेरच्यासमाेर त्या समस्येचे समाधान मांडा. जेणेकरून पुन्हा त्याच मुद्यावर वाद हाेणार नाही. उदाहरणार्थ आपण सांगू शकता की, पुढील वेळी अशी स्थिती आल्यास आपण थाेडा वेळ एकमेकांशी बाेलणे बंद करू कारण अशाप्रकरे एकमेकांवर आराेप-प्रत्याराेप केल्यास भांडण कधीच संपणार नाही.’ आपले हे पाऊल हे दर्शविते की, आपण आपल्याकडून सकारात्मक पावले उचलण्यास तत्त्पर तत्पर आहात.