ओशाे - गीता-दर्शन

15 Oct 2025 22:43:59
 

Osho 
 
तेव्हा आपण दुःखापासून वाचायला पात्र व्हाल. तेव्हाच आनंदाचं दालन आपणासाठी उघडेल. जेव्हा एखादा स्वतःला सुखापासून दूर ठेवताे, तेव्हाच त्याची चित्ताची डाेलणारी ज्याेती स्थिर हाेते. लक्षात ठेवा जाे सुखात डाेलणार नाही, ताे दुःखात कधीच डळमळणार नाही.सुखात डाेललात की दुःखात डाेलावेच लागेल. दुः खाचं कंपन हे अनिवार्यपणे सुखकंपनाच्या परिपूर्तीचं काम करीत असतं. काॅप्लीमेंटरी असतं. आपण घड्याळाचा लंबक डावीकडे नेलात तर ताे उजवीकडे जाणारच.जायलाच लागेल, त्याला त्यापासून वाचवताच येणार नाही. सुखाने डाेललात की दुःखाने कंपित व्हावेच लागेल; पण आपणास सुखानं कंपित हाेण्याची इच्छा असते आणि दुःखाने कंपित व्हावं असं मात्र अजिबात वाटत नसते.
 
प्रत्यक्ष मात्र याच्या उलट करावं लागेल. अशी इच्छा ठेवा की सुखानं कंपित व्हायचं, मग आपणाकडे दुःख ढुंकूनसुद्धा बघणार नाही. सुखाच्या शाेधात असताना जेव्हा जेव्हा सुख मिळते तेव्हा जरा जागे व्हा आणि पाहा की सुख आपल्यामध्ये कंपन तर निर्माण करीत नाहीये ना. हे अवघड नाहीये, फ्नत आठवण ठेवायची. तेव्हा हे अवघड तर अजिबात नाही. फ्नत असं करायचं याची आपणास कल्पना नसते, एवढंच.आपल्याला या गाेष्टींची आठवणच नाहीये की, सुख हेच आपलं दुःख आहे. दुःखाला दुःख समजणे व सुखाला सुख समजणे हीच आपली भ्रांती आहे. आणि ही भ्रांती सामूहिक आहे. ती वैय्नितक नसून सामूहिक आहे.जेव्हा आपला मुलगा शाळेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यावर नाचत घरी येईल. तेव्हा आपण हे उमजून असा की ताे दुःखाची तयारी करीत आहे.
Powered By Sangraha 9.0