‘नॅपकेशन्स’: शांत झाेप आणि विश्रांतीसाठी देशातील सुट्टीचा नवा ट्रेंड

15 Oct 2025 22:49:34
 

nap 
 
जेव्हा सुट्टीबद्दल विचार केला जाताे, तेव्हा बहुसंख्य लाेकांना प्रसिद्ध स्थळांना भेट देणे, नवे खाद्यपदार्थ चाखणे, विशेष खरेदी करणे आणि भरगच्च कार्यक्रम ठेवून दिवस काढणे, अशी कल्पना सुचते. पण आता एक नवा ट्रेंड ही पारंपरिक संकल्पना बदलताेय - ‘नॅपकेशन्स.’ अधिकाधिक भारतीय आता विश्रांतीसाठीच्या सुट्ट्या शाेधत आहेत. ‘नॅपकेशन्स’ हा शब्द ‘नॅप’ (म्हणजे झाेप) आणि ‘व्हेकेशन्स’ (म्हणजे सुट्टी) यांचे मिश्रण आहे. हा ट्रेंड म्हणजे राेजच्या डेडलाईन्स आणि गाेंधळातून थाेडा विरंगुळा घेऊन झाेप भरून काढणे - म्हणजेच जीवनातील सर्वांत दुर्लक्षित ‘लक्झरी’ आहे झाेप! ‘मला फारसा वेळ झाेपायला मिळत नाही.म्हणून या वर्षी, जेव्हा मी जुलैमध्ये सुट्टी घेतली, तेव्हा मला आरामदायी हाॅटेलमध्ये फक्त राहायचे हाेते आणि पर्वतांच्या रांगा पाहत उठायचे हाेते,’ आशिष सिंग (वय 32 वर्षे, फायनान्स प्राेफेशनल) सांगतात.
 
उत्तराखंड किंवा हिमाचलपर्यंत प्रवास न करता, सिंगने केरळच्या मुनार येथील एका व्हिला प्राॅपर्टीत तीन दिवसांची सुट्टी बुक केली.‘मी जेव्हा हाॅटेलमध्ये पाेहाेचलाे, तेव्हापासूनच माझा फाेन मी बंद ठेवला. दिवसात कधीतरी थाेडे फिरणे साेडल्यास, मी काहीच वेगळे काम केले केले नाही. मला फक्त शांततेचा, आरामाचा आणि झाेपेचा अनुभव घ्यायचा हाेता,’ आशिष सिंगसांगतात‘नॅपकेशन्स’ म्हणजे पर्यटनस्थळांवरील गडबड आणि ‘टू-डू’ लिस्टऐवजी शांत, नियाेजित विश्रांतीचा अनुभव. येथे ‘ब्लॅकआउट’ पडदे, फाेम बेड्स, ध्यानधारणा सत्रे, ‘रिचार्जिंग स्पा ट्रीटमेंट्स’ आणि अगदी ब्रेकफास्ट - बेडपर्यंत सर्व काही दिले जाते. सिंग यांच्या सारखा अनुभव घ्यायचा असेल तर आता अनेक हाॅटेल्स आणि रिसाॅर्ट्सनी ‘नॅपकेशन्स’साठी खास पॅकेजेस तयार केली आहेत. ‘पर्यटक आम्हाला अशा अधिकाधिक ‘अनस्ट्रक्चर्ड टाइम’ची मागणी करताना दिसतात, जिथे विश्रांती, झाेप आणि शांतता हाच सुटीचा मुख्य हेतू असताे. आमचे रिसाॅर्ट, लाेकांना त्यांच्या गतीने जगण्याची आणि पुनरुज्जीवनाची संधी देते,’ असं ऋषीकेशमधील किन्वानी हाऊसचे गाेपाल कृष्णा सांगतात.
 
‘तापमान नियंत्रित पाणी असलेल्या पुलमध्ये आराम करणे, फक्त झाेप घेणे किंवा हळूवार अनुभवांचा आनंद घेणे! आमचे उद्दिष्ट म्हणजे असे वातावरण निर्माण करणे, जिथे विश्रांती आणि पुनरुज्जीवन नैसर्गिक पद्धतीने हाेईल,’ असे कृष्णा पुढे सांगतात.हा ‘नॅपकेशन्स’चा ट्रेंड आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाेहाेचला आहे.आम्हाला पर्यटकांचा एक नवीन वर्ग दिसताे आहे, जे ‘अनस्ट्रक्चर्ड लक्झरी’ शाेधत आहेत, म्हणजेच वेळ आणि जागा जिथे ते आरामात झाेपू शकतात, शांततेचा अनुभव घेऊ शकतात आणि विश्रांती घेऊ शकतात,’ असे श्रीलंकेतील रेस्प्लेंडंट सायलाॅनचे चामिंद्रा गुणेवर्दने सांगतात.‘हाॅटेलमध्ये पर्यटकांसाठी आनंदायी अनुभवांची साेय केली जाते - सुगंधी अंघाेळ, चहावर आधारित उपचार आणि अशा जागा जिथे पुनरुज्जीवन, नैसर्गिक विश्रांती आणि वैयक्तिक आनंद मिळेल, काेणत्याही बंधनांशिवाय,’ गुनेवर्दने सांगतात.
Powered By Sangraha 9.0