जेएनपीएच्या अध्यक्षपदी गाैरव दयाळ

15 Oct 2025 22:20:39
 

jj 
 
जवाहरलाल नेहरू पाेर्ट अ‍ॅथाॅरिटीच्या (जेएनपीए) अध्यक्षपदी 2004च्या उत्तर प्रदेश बॅचचे आयएएस अधिकारी गाैरव दयाळ यांची केंद्राने नियु्नती केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही नियु्नती असेल.संजय सेठी यांच्या जागी त्यांची नियु्नती करण्यात आली आहे. गेल्या दीड दाेन वर्षांपासून हे पद र्नित हाेते. उपाध्यक्ष उन्मेष वाघ हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहात हाेते. सध्या जेएनपीएचे विविध प्रकल्प सुरू आहेत. बंदरात नव्याने सिंगापूरचे बीएमसीटी या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता 73 लाखांवरून 1 काेटीवर पाेहाेचणार आहे. या भरारीमुळे जेएनपीए बंदर जगातील 96 व्या क्रमांकावरून 23व्या क्रमांकावर पाेहाेचले आहे. कंटेनर हाताळणीत जेएनपीए देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर आहे. अशा या बंदर प्राधिकरणासाठी आता पूर्णवेळ अध्यक्ष नियु्नत करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0