चांगले वागलात तर, चांगुलपणा कळुन येईल

11 Oct 2025 15:13:27
 
 
 

thoughts
 
रागावू नका: दिवसभरात एखाद्यावेळी आपण ऑिफसमधील कामाचा ताण किंवा घरगुती बाबींच्या ताणामुळे रागावताे. नैराश्य प्रकट करताे. पण त्याऐवजी स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. तुम्हांला राग नियंत्रित करता येत नसेल तर मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करणे, याेग करणे या मार्गांचा अवलंब करून पहा. कुठल्याही प्रश्नावरून संतप्त हाेऊ नका. शांततेने आणि समजुतीने प्रश्न साेडवण्याचा प्रयत्न करा.
 
देणगी द्या: चला उठा आणि एखाद्या स्वयंसेवी संस्थेसाठी किंवा चांगल्या कामासाठी देणगी द्या. कमी सुदैवी ठरलेल्यांसाठी मदत करणे कधीही चांगले. पुन्हा आता एवढा खर्च आहे नंतर देणगी देऊ किंवा मदत करू असा विचार करू नका. कारण खर्च, स्वतः च्या वाढत्या गरजा हे कायमच राहणार आहे. मात्र, निरपेक्ष भावनेने दिलेल्या देणगीमुळे शरीरावर आणि शरीरातील रक्तभिसरणावर सकारात्मक परिणाम हाेताे.आपण परिपूर्ण जीवन जगत नसलाे आणि आपल्या अनेक इच्छा अजून पूर्ण व्हायच्या असतील तरीही जे उपाशी आहेत आणि ज्यांना दाेन वेळेच जेवणही मिळत नाही त्यांची आठवण ठेवा. त्यामुळे अशा संस्थांमध्ये पैसे, कपडे, धान्य स्वरुपात देणगी द्यावी. त्यातून आपण दुसऱ्याच्या वेदना आणि दुःख शेअर करत असताे.
 
दयाबुद्धीने वागा: दुसऱ्यांच्या भावनांची अनुभूती आणि दयाबुद्धी हा तुमचा धर्म हाेऊ द्या. जगात काही चांगले घडण्यासाठी मदत करा. दुसऱ्यांना मदतीचा हात द्या. पृथ्वीवर हजाराे वर्षे मानवजात टिकून आहे ती केवळ दुसऱ्यांच्या ज्येष्ठांना मदत करा ः बदलत्या काळात आईवडिलांचा सांभाळ आणि मुलांचे नीट पालनपाेषण हाच आपला धर्म आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कितीही धार्मिक कृत्ये केली तरी त्यामुळे सुख-समाधान लाभत नाही. त्यामुळे आईवडिलांना कधीही वेदना देऊ नका. त्याचबराेबर आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांविषयी आदर बाळगा. त्यांना आवश्यक तेव्हा मदत करा.
 
कुटुंबावर प्रेम करा: चांगली व्यक्ती हाेण्याच्या मार्गातील हा महत्वाचा मुद्दा आहे. कधीकधी कुटुंबात कुणाशी मतभेद झाले की आपण त्या व्यक्तीशी बाेलणे थांबवताे. घरातील व्यक्तींसाठी आवर्जून वेळ काढा.त्यांच्याशी चांगला संवाद ठेवा. घरातील लहानांपासून थाेरांपर्यंत सगळ्यांशी तुम्ही चार प्रेमाच्या गाेष्टी केल्या, संवाद साधला तर त्यांनाही आनंद वाटेल.
 
स्वतःवर प्रेम करा: तुमचे स्वतःवर मनस्वी प्रेम असेल हे सगळे सांगितलेले मुद्दे प्रत्यक्षात येतील. तुम्ही स्वतःवर प्रेम केले, स्वतःचा आदर राखला की सगळे जग तुमचा आदर करेल. सन्मानाने जगा. जेणेकरून थकल्यावर मागे वळून पहाल तेव्हा तुम्हांला समाधान वाटेल. स्वतःच्या वागण्यातील काही बाबी खटकत असतील तर त्या सुधारण्यावर भर द्या.
Powered By Sangraha 9.0