नर्मदेच्या किनाऱ्यावर गरुडेश्वर हे दत्तभ्नतांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दत्त परंपरेतील थाेर सत्पुरुष वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांची समाधी या ठिकाणी आहे.दरवर्षी वासुदेवानंदांची जयंती आणि पुण्यतिथी येथे माेठ्या उत्साहात साजरी केली जाते.मनाेभावे प्रार्थना केल्याने इथे साक्षात वासुदेवानंद सरस्वतींचे दर्शन घडते, असा अनेकांचा अनुभव आहे.