माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी नगरी असलेल्या पुण्यातील महापालिकेच्या शाळांमधील ई-लर्निंग स्कूल प्रकल्प मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. केवळ इंटरनेट नसल्याने ही यंत्रणा बंद पडली असून, यामुळे विद्यार्थी हायटेक शिक्षण घेण्यापासून वंचित आहेत. इंटरनेट सुविधा देण्यासाठीची फाइल ऑडिट विभागाकडे अडकून पडल्याने दिवाळीनंतरच ही यंत्रणा सुरू हाेणार असल्याने ताे पर्यंत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे.पुणे महापालिकेने मागील सात आठ वर्षांपासून त्यांच्या शाळांमध्ये ई-लर्निंग उपक्रम सुरू केला.सुरुवातीला खासगी संस्थेच्या मदतीने काही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आल. नंतर जवळपास सर्वच अर्थात 265 शाळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था उभारण्यात आली. सर्व वर्गखाेल्यांमध्ये स्क्रीन बसविण्यात आले.
शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून साॅफ्टवेअरद्वारे दृक्श्राव्य स्वरूपात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले.सन 2020 आणि 2021 मध्ये काेराेनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने हा प्रकल्प बंद राहिला. दरम्यान, या कालावधीतच इंटरनेट सेवा खंडित झाली आणि तेव्हापासूनच ई-लर्निंग बंद झाले आहे.सध्या प्रशासकराज सुरू आहे. असे असताना देखील ई-लर्निंग सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून फारसे प्रयत्न झाले नसल्याचे समाेर आले आहे. लाेकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ई-लर्निंग प्रकल्प जवळपास पूर्ण बंद पडला आहे. महापालिकेच्या 265 शाळांमध्ये गरीब कुटुंबांतील जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इंटरनेटच्या युगात आता एआय तंत्रज्ञान आले आहे.अशावेळीच महापालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प बंद झाल्याने महापालिकेचे विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडत असल्याची स्थिती आहे. या संदर्भात अतिर्नित महापालिका आयु्नत प्रदीप चंद्रन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ई-लर्निंग शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. इंटरनेट सुविधा पुरविण्यासंदर्भात फाइल ऑडिट विभागाकडे प्रलंबित असून, लवकरात लवकर त्यावर आवश्यक मंजुरी घेऊन येत्या काही दिवसांत ज्या शाळांमध्ये ही यंत्रणा आहे अशा 148 शाळांमध्ये येत्या काही काळात हा प्रकल्प तातडीने सुरू केला जाईल.